Pathardi News : नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील रस्त्याचे काम हप्ता मागण्याच्या कारणावरून बंद पाडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार गट) सरचिटणीस प्रताप ढाकणे हे मंगळवारी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.
प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भीक मागो आंदोलन झाल्यानंतर पालिकेतील मुख्याधिकारी यांच्या दालनातील खुर्चींची मोडतोडही झाली. एवढंच नाही तर मुख्याधिकारी यांची खुर्ची इमारतीवरून खाली फेकली गेली. तसेच याप्रसंगी ढाकणे यांनी आमदार मोनिका राजळे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पाथर्डी शहरातील नवीपेठेतील रस्त्याचे काम काही तरुणांनी लोकप्रतिनिधीसा हप्ता का दिला नाही, असे म्हणून बंद पाडले. या कारणावरून पाथर्डी शहरातील राजकीय वातावरण तापणार, अशी चर्चा सुरू असतानाच, प्रताप ढाकणेंनी(Pratap Dhakane) आक्रमक भूमिका घेतली.
प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली शहरात भीक मागो आंदोलन करण्यात आले. हा मोर्चा नगरपालिकेतील मुख्याधिकारी यांच्या दालनात आला. तिथे ढाकणे आणि कार्यकर्ते चांगले आक्रमक झाले. लोकप्रतिनिधी आणि भ्रष्ट अधिकारी यांचा निषेध करण्यात आला. तसेच तेथील खुर्च्यांची मोडतोड करण्यात आली. मुख्याधिकारी नसल्याने ढाकणे आणि कार्यकर्त्यांना नगरपालिकेतील संबंधितांकडून सकारात्मक उत्तर मिळाली नाही. त्यामुळे अधिकच संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी यांची खुर्ची इमारतीबाहेर फेकून दिली.
प्रताप ढाकणे यांनी यानंतर आमदार मोनिका राजळे(Monika Rajle) यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. प्रताप ढाकणे म्हणाले, 'बाराशे कोटींच्या विकासकामांच्या जाहिराती केल्या. त्यातील किती पैसे तुमच्या खिशात गेले. याचा हिशोब द्यायला मी तयार आहे. त्यासाठी माझी तयारी असून मी सिद्ध करून देतो.
गेल्या एक वर्षापासून मतदारसंघातील बाराशे कोटींचा विकासकामाचा हिशोब आमच्या बहिणबाईला मागतोय, त्या देत नाही. त्यांची हिंमत होत नाही.' तसेच 'आम्ही काही बोललो की, विरोधकांना टीका करण्याशिवाय काय काम? असे मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी म्हणतात. मग आता हे टक्केवारीचा पाप कुणी केले?' असा सवालही केला.
याचबरोबर 'मार्च अखेर येताच मुदतीत काम करायचे आणि बिलं काढायचा धंदा या तालुक्यात जोरात सुरू असून, या नादात निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तर असा एक रस्ता दाखवावा की तो आजही चांगल्या दर्जाचा असून सुस्थितीत आहे. तसं असेल तर तुम्ही म्हणाल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे.'असे आवाहन प्रताप ढाकणे यांनी आमदार राजळे यांना दिले.
तसेच 'मुठभर तुमच्या बगलबच्चांना हाताशी धरून वाटेल, तशा पद्धतीची ठेकेदारी सुरू असून एकूण रकमेच्या वीस ते पंचवीस टक्क्यांतच कामं केली जातात. बाकीची रक्कम जाते कुठे? भ्रष्टाचाराने बंधारे, रस्ते निकृष्ट झाले आहेत. लोकशाहीतील लोकप्रतिनिधी टक्केवारीत रमत असेल तर त्या मतदारसंघाचे भले होणार नाही.' असेही प्रताप ढाकणे यांनी म्हटले.
पाथर्डी नगरपालिकेच्या नवीन इमारतीला बाहेरच्या बाजूने ऍक्रोलिक पॅनलिंग आणि इतर सुशोभीकरणाचे सुमारे दीड कोटीचे काम सुरू असून या कामाबाबत कोणताही ठेका अधिकृतरित्या झालेला नाही. या कामासंदर्भात कुठलीही कामाचा कार्यारंभ आदेश संबंधित ठेकेदाराला दिला गेलेला नाही.
तर कामाचा ठेका होण्याच्या पूर्वीच बेकायदेशीररित्या काम सुरू आहे. मर्जीतल्या माणसाला ठेका देण्याचा प्रताप नगरपालिका प्रशासनाने केला आहे. या कामात कुणी ठेका भरून नये त्यासाठी दबाव तंत्राचा वापर नगरपालिकेतील कोणत्या अधिकाऱ्याकडून होता, याचीही चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी. असा देखील मुद्दा या आंदोलनातून पुढे आला आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.