Sharad Pawar News : अधिवेशन राष्ट्रवादीचे, खेळी थोरातांची अन् शरद पवार मंत्री विखेंच्या घरच्या मैदानावर

NCP statewide convention : शिर्डी येथे राष्ट्रवादीचे अधिवेशन
Radhakrishna Vikhe and Sharad Pawar
Radhakrishna Vikhe and Sharad Pawarsarakarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डी (ता. राहाता) येथे उद्यापासून राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अधिवेशनाच्या एक दिवस अगोदरच येथे दाखल झाले आहेत. राज्याचे महसूल तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या घरच्या मैदानावर राष्ट्रवादीचे अधिवेशन होत असल्याने पवार हे काय राजकीय भाष्य करतात आणि कोणती राजकीय खेळी खेळतात, याकडे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, शरद पवार यांनी संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील एका जाहीर कार्यक्रमाला हजेरी लावली असून, याचे संपूर्ण नियोजन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले होते. त्यामुळे मंत्री विखे यांना पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून घेरण्याचा हा प्रयत्न होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे 'ज्योत निष्ठेची-लोकशाहीच्या संरक्षणाची' शिर्डी येथे उद्यापासून दोन दिवस राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. लोकसभा आणि विधानसभा निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत असल्याने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने मोठी ताकद लावली आहे. या अधिवेशनाला राष्ट्रवादीचे आमदार, खासदार, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आले आहेत. अशोक वानखेडे, डॅा. विश्वंभर चौधरी, डॅा. सुरेंद्र जोंधळे, हिना कैसर खान, संजय आवटे, आशिष जाधव, प्रशांत कदम, नीरज जैन यांच्यासह ज्येष्ठ विचारवंत या राज्यव्यापी अधिवेशनात सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत.

दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात राज्य आणि देशातील राजकीय परिस्थिती, शेतकरी, महिलांचे प्रश्न, तरूण, युवक यांच्या शैक्षणिक प्रश्नांबरोबरच बेरोजगारीचे वाढते प्रमाण, महागाई, महाराष्ट्रातील उद्योजकाची परिस्थिती, लोकशाहीचे मूल्य, संविधानाचे अवमूल्यन या मुद्यांवर मंथन होणार आहे. तसेच राष्ट्रवादीच्या पक्ष संघटनेच्या विस्तार यावर मंथन होणार आहे. यानिमित्ताने शरद पवार हे शिर्डीत दोन दिवस मुक्कामी असणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादीचे हे अधिवेशन भाजप नेते महसूल नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या घरच्या मैदानावर होत आहे. या अधिवेशनातून मंत्री विखे यांना घेरण्याचा प्रयत्न होणार हे मात्र निश्चित! पवार-विखे यांच्यातील पूर्ववैमनस्य सर्वश्रुत आहे. राष्ट्रवादीचे अधिवेशन हे शरद पवार यांच्या उपस्थितीत मंत्री विखे यांच्या घरच्या मैदानावर होत आहे. परंतु काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंत्री विखे यांना या अधिवेशनानिमित्ताने पुन्हा घेरण्याची संधी सोडली नाही.

शरद पवार यांच्या उपस्थितीत संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील आरपीआयचे नेते बाळासाहेब गायकवाड यांच्या अभीष्टचिंतन कार्यक्रमाला हजेरी लावून घेतली. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आमदार थोरात यांनी केले होते. विशेष म्हणजे, आश्वी हे गाव मंत्री विखे यांच्या मतदारसंघात येते. बाळासाहेब गायकवाड यांच्या अभीष्टचिंत सोहळ्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले येणार होते. परंतु ते आले नाहीत. मंत्री आठवलेंचा उल्लेख कार्यक्रम पत्रिकेवर होता. परंतु मंत्री विखे यांचा उल्लेख टाळला होता.

Radhakrishna Vikhe and Sharad Pawar
Kolhapur Politics : कोल्हापुरात महाडिक-पाटील वाद पेटला; राजाराम कारखान्याच्या संचालकांना बेदम मारहाण

आमदार थोरात यांची ही राजकीय खेळी, आगामी काळातील मोठ्या राजकीय खेळाची नांदी असल्याचे सांगितले जात आहे. मंत्री विखे आणि थोरात यांच्या गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून रंगलेले राजकारण आणि या निवडणुकीत मंत्री विखे गटाचा झालेला पराभव अजूनही चर्चेत आहे. यातच आमदार थोरात यांनी शरद पवार यांना मंत्री विखे यांच्या घरच्या मैदानावर पाचारण करत शह देण्याचा पुन्हा प्रयत्न केला आहे. विखे-थोरात काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या चांगलेच वैर रंगत होते. या वैमनस्याची धार अजून काही कमी झालेली दिसत नाही. निवडणुका जशा जवळ येत आहे, तशी ही धार आणखी वाढताना दिसत आहे.

Radhakrishna Vikhe and Sharad Pawar
Amravati : हिंमत असेल तर आमदार अपात्रतेचा निर्णय घ्या, सरकारला कुणाचे आव्हान..

पवार मुख्यमंत्री असताना आले होते आश्वीत !

शरद पवार हे ४० वर्षानंतर आश्वी गावात आले होते. पवार मुख्यमंत्री असताना ते आश्वी गावात आले होते. सजवलेल्या बैलगाडीतून त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. आमदार बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांना मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघात आणून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. राष्ट्रवादीचे उद्यापासून राज्यव्यापी अधिवेशन सुरू होत आहे. यात शरद पवार हे काय राजकीय भाष्य करतात याकडे लक्ष लागले आहे.

Edited by: Chaitanya Machale

Radhakrishna Vikhe and Sharad Pawar
Pune Congress : ...म्हणून पुणे काँग्रेस रस्त्यावरच भरवणार शाळा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com