धुळे : शहराच्या (Dhule) दहाव्या महापौरपदी भाजपच्या (BJP) प्रतिभा चौधरी (Pratibha Choudhary) विराजमान झाल्या. त्या शहराच्या चौथ्या महिला (Women) महापौर ठरल्या. यापूर्वी मंजुळा गावित, (Manjula Gavit) जयश्री अहिरराव (Jayshree Mahajan) आणि कल्पना महाले (Kalpna Mahale) या महिला महापौर होत्या. त्यामुळे त्यांची निवड चर्चेचा विषय ठरला. (BJP`s Pratibha Choudhary became unopposed mayor of Dhule City)
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी किरण कुलेवार, तर महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी सारिका अग्रवाल व उपसभापतिपदी विमलबाई पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर नूतन चारही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पदभार घेतला.
महापौर प्रदीप कर्पे यांच्या राजीनाम्यानंतर उर्वरित कालावधीसाठी रिक्त झालेल्या महापौरपदासाठी निवडणूक प्रक्रिया झाली. महापौरपदासाठी महापालिकेतील सत्ताधारी भाजपतर्फे अनेक जण इच्छुक होते. त्यामुळे रस्सीखेच सुरू होती. यात कोण बाजी मारणार याकडे धुळेकरांचे लक्ष होते. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४ फेब्रुवारीला अखेर भाजपतर्फे प्रभाग ४ (ब)च्या नगरसेविका श्रीमती चौधरी यांचा अर्ज दाखल झाला आणि महापौरपद कुणाच्या वाट्याला या विषयावर पडदा पडला.
त्याचबरोबर स्थायी समिती सभापतिपदासाठी प्रभाग ७ (क)च्या नगरसेविका श्रीमती कुलेवार व महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी प्रभाग १८ (क)च्या नगरसेविका श्रीमती अग्रवाल, तर उपसभापतिपदासाठी प्रभाग १ (ड)च्या नगरसेविका श्रीमती पाटील यांचेच अर्ज दाखल झाले. शिवाय या निवडणुकीच्या रिंगणात विरोधी पक्षांकडून कुणीही उतरले नाही. त्यामुळे चारही पदे बिनविरोध झाल्याचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दिवशीच निश्चित झाले. दरम्यान, या निवडीची औपचारिक प्रक्रिया तेवढी बाकी होती.
विशेष सभेत घोषणा
महापौर निवडीसाठी बुधवारी (ता. ८) सकाळी अकराला विशेष सभा झाली. जिल्हाधिकारी जलज शर्मा पीठासीन अधिकारी होते. आयुक्त देवीदास टेकाळे, नगरसचिव मनोज वाघ उपस्थित होते. महापौरपदासाठी पीठासीन अधिकारी शर्मा यांनी नामनिर्देशनपत्रांची छाननी, वैध नामनिर्देशनपत्राची घोषणा, माघारीसाठी मुदत आदी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून पदासाठी एकमेव अर्ज असल्याने श्रीमती चौधरी यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. श्रीमती चौधरी यांची महापौरपदी निवड झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांसह त्यांच्या समर्थकांनी महापालिकेबाहेर फटाके फोडत जल्लोष केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.