नाशिक(Nashik): शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackrey) गटाबरोबर युतीची घोषणा झाली आहे. वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) नाशिकमध्ये (NMC) किमान ५० जागा हव्या आहेत. महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने एव्हढ्या जागा दिल्या तर त्यांनी निवडणूक लढवावी की नाही, असा प्रश्न उभा राहू शकतो. (Will Shivsena & Vanchit Aghadi seat distribution took place smoothly)
वंचित बहुजन आघाडीचे महानगरप्रमुख अविनाश शिंदे म्हणाले, शिवसेनेकडून आम्हाला किमान पन्नास जागा सुटल्या पाहिजेत, अशी आमची आग्रही मागणी राहील. त्यामुळे महापालिकेच्या १२२ जागांत शिवसेनेने कोणा कोणाला जागा सोडाव्यात आणि स्वतःला किती राहणार याचा विचार करण्याची वेळ येऊ शकते.
वंचित बहुजन आघाडीने महापालिका निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सातत्याने दौरे केल्यामुळे पक्षाचे मोठ्या प्रमाणात प्राबल्य वाढल्याचा दावा स्थानिक नेत्यांनी केला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून या पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच इतर अनेक पक्षांचे मान्यवर नेते आणि कार्यकर्तेही पक्षाशी संपर्क साधून असून त्यांनाही तिकिटाची मोठी आस लागून राहिली आहे. या क्षणी निवडणुका लागल्या तरी सर्व १२२ जागांवर भक्कम उमेदवार आम्ही उभे करू शकतो. इतकी आमची ताकद निर्माण झाली आहे.
उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्यात युतीबाबत बोलणी झाली आहे.त्यामुळे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा भाऊ मानतो आणि ५० जागांवर आम्ही त्यांच्याकडे दावा करणार आहोत. उर्वरित ७२ जागा त्यांनी घ्याव्यात, असे आमचे म्हणणे आहे. युतीचे जागावाटप असे झाले तर शिवशक्ती आणि भीमशक्तीला कोणी रोखू शकणार नाही व नाशिक महानगरपालिकेवर उभय पक्षाचा संयुक्त झेंडा निश्चितच फडकेल असा विश्वास वाटतो, असेही शिंदे म्हणाले.
युतीबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांबरोबर या आधी प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली आहे. आता लवकरच आणखी महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यावेळी आम्ही जागा वाटपाबाबत आमचा प्रस्ताव त्यांच्यापुढे मांडू असेही शिंदे यांनी स्पष्ट केले
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.