Uddhav Thackeray : ठाकरे गटाकडून नाशिकमधील अधिवेशनाची जोरदार तयारी; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार!

Shivsena News : मंगळवारी सायंकाळी जाहीर सभाही घेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह भाजप असणार प्रमुख लक्ष्य
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन मंगळवारी नाशिकला होत आहे. या अधिवेशनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका होणार आहे.

यासाठी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) सोमवारी शहरात दाखल होत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला शहरात शिवसेनेचे भगवे झेंडे आणि मशालीच्या चिन्हांसह शहरभर लावण्यात आलेल्या फलकांमुळे नाशिक शहर भगवामय झाले आहे. या अधिवेशनात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची राजकीय दिशा ठरविणारे ठराव करण्यात येणार आहेत. याबाबतचे सर्व नियोजन मुंबईतून करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांवर पक्षाच्या नेत्यांच्या स्वागताची तयारी सोपविण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray News
Aaditya Thackeray : '...तर महाशक्तीला आडवं करू', आदित्य ठाकरेंनी फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग!

या अधिवेशनात प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी केलेली बंडखोरी गेल्या वर्षभरात राज्य सरकारने राबविलेला राजकीय कार्यक्रम आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रते संदर्भात दिलेल्या निकालाची समीक्षा करण्यात येणार आहे. यामध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप नेते लक्ष्य असतील. या अधिवेशनाच्या निमित्ताने ठाकरे गटाचे अनेक नेते शहरात दाखल झाले आहेत.

तर उद्धव ठाकरे सोमवारी सकाळी ११ वाजता विशेष विमानाने ओझर येथे दाखल होतील. त्यानंतर ते थेट भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट देतील. दुपारी महत्त्वाच्या नेत्यांसमवेत अधिवेशनातील कार्यक्रमांवर चर्चा होईल. सायंकाळी पाच वाजता ते काळाराम मंदिरात जाऊन श्री रामाचे दर्शन घेणार आहेत आणि सायंकाळी सहा वाजताा रामकुंडावर गोदावरीची आरती करतील.

मंगळवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasheb Thackeray ) यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर पक्षाच्या अधिवेशनाला सुरुवात होईल. सकाळी दहा ते दोन या वेळेत पक्षाचे वरिष्ठ नेते राजकीय आढावा घेणारी भाषणे तसेच ठराव मांडतील. उद्धव ठाकरे समारोपाचे भाषण करतील. त्यानंतर सायंकाळी सात वाजता गोल्फ क्लब मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे मंगळवारी अयोध्येत श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा होणार असली तरी, नाशिकमध्ये मात्र उद्धव ठाकरे यांचा दौरा आणि अधिवेशन यामुळे वातावरण शिवसेनामय असेल अशी स्थिती आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com