PM Modi
PM Modi Sarkarnama

PM Modi Nashik Daura:..म्हणून पंतप्रधान मोदी गोदाआरतीला येणार नाहीत

National youth festival Nashik: नाशिकमध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते.
Published on

अरविंद जाधव :

Nashik News: नाशिकमध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार होते. मात्र, आता श्री काळारामाचे दर्शन आणि गोदाआरती करण्यासाठी येण्याची शक्यता सध्यातरी धुसर झाली आहे. विशेष म्हणजे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी यावर शिक्कामोर्तब केले.

याबाबत बोलताना महाजन यांनी सांगितले, पंतप्रधानांनी काळारामाचे दर्शन घ्यावे आणि गोदा आरती करावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आम्ही पंतप्रधान कार्यालयात संपर्क देखील केला. पंरतु सुरक्षिततेच्या कारणांमुळे काळाराम मंदिर भेट आणि गोदाआरतीसाठी पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप परवानगी आलेली नाही, असे महाजन यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

PM Modi
Maratha Vs OBC : मराठा, ओबीसी समाजात समन्वय ? मुंबईत दोन्हीकडील समन्वयक भेटले...

भाजपसह हिंदुत्वावादी संघटना मात्र यासाठी प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील शेतकरी सरकारवर नाराज आहेत. याची जाणिव सत्ताधारी भाजपालाही आहे. त्यामुळे भाजपाच्या थिंक टँकने पंतप्रधान मोदींचा दौरा तसेच युवा महोत्सवाचे आयोजन भव्य दिव्य करण्याचे नियोजन आखले आहे.

सरकारविरोधात असलेले जनमत बदलण्याची ताकद मोदींच्या दौऱ्यात असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात येतो. त्याचाच एक भाग म्हणून काळाराम मंदिर दर्शन आणि गोदा आरतीचे आयोजन भाजपाने केले. मात्र, तुर्तास पंतप्रधान कार्यालयाने सुरक्षेचे कारण पुढे करीत सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.

दरम्यान, पंतप्रधान मोदींचा रोड शो होऊ शकतो. राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये नाशिकसह देशातील हजारो युवक हजरी लावणार आहेत. या कार्यक्रमाच्या तयारीत कोठेही कमी राहणार नाही, याची दक्षता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वरिष्ठ मंत्री घेत आहेत. यासाठी सतत बैठकांचेही आयोजन होते आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या कार्यक्रमाच्या निमित्ताने तयार होणारे वातावरण कायम राखण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्नशील आहे.

कांदा निर्यातबंदीबाबत चर्चा सुरू

कांदा निर्यातबंदीबाबत चर्चा सुरू असून, लवकरच त्यावर तोडगा निघेल, असे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. कांदा निर्यात बंदी घालून सरकारने शहरी भागातील दिलासा दिला असला तरी यामुळे कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड नाराज आहेत. मोदींच्या दौऱ्याकडेही शेतकरी संघटनेचे लक्ष लागले आहे. अशावेळी महाजनांनी निर्यातबंदीबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगत शेतकऱ्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com