Maratha Vs OBC : मराठा, ओबीसी समाजात समन्वय ? मुंबईत दोन्हीकडील समन्वयक भेटले...

Discussion between Yogesh Kedar, Prakash Shendge : योगेश केदार, प्रकाश शेंडगे यांच्यात चर्चा; संघर्ष टाळण्यासाठी ही भेट झाल्याची माहिती.
Yogesh Kedar, Prakash Shendge and Somnath Kashid.
Yogesh Kedar, Prakash Shendge and Somnath Kashid.Sarkarnama
Published on
Updated on

- जुई जाधव

Maratha Vs OBC : राज्यात सध्या ओबीसी समाजाविरुद्ध मराठा समाज अशी लढत पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणं चुकीचं आहे, ही भूमिका ओबीसी नेत्यांची आहे. ते या भूमिकेवर ठाम देखील आहेत. मात्र, आता चित्र पालटण्याची शक्यता आहे. मराठा समन्वयक योगेश केदार यांनी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची भेट घेतली आहे.

येत्या 20 जानेवारीला मुंबईत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आंदोलन करणार आहेत. त्याच वेळेला ओबीसी समाजातर्फे देखील आंदोलन केलं जाणार असून त्याबाबतची परवानगी ओबीसी (OBC) नेत्यांनी पोलिसांकडे मागितली आहे. मात्र मुंबईत मराठा समन्वयक योगेश केदार आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी भेट झाली आहे. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.

Yogesh Kedar, Prakash Shendge and Somnath Kashid.
CM Eknath Shinde : विरोधकांना काही काम उरलं नाही..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला...

या भेटीमध्ये योगेश केदार, प्रकाश शेंडगे आणि ओबीसी, बारा - बलुतेदार नेते सोमनाथ काशीद देखील उपस्थित होते. संघर्ष टाळण्यासाठी ही भेट झाल्याची माहिती मिळत आहे. भेटीमध्ये दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याची माहिती मिळत आहे. समाजात तेढ निर्माण होऊ नये अशी दोघांनी भावना व्यक्त केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आंदोलनाचा निर्णय गुलदास्त्यात...

मनोज जरांगे पाटील हे 20 जानेवारीला मुंबईत आंदोलन करणार आहेत. त्याचं वेळेला ओबीसी समाजाकडून देखील आंदोलन केलं जाणार आहे. ओबीसी विरुद्ध मराठा असे दोन्ही समाज एकत्र येण्याची शक्यता आहे. मात्र, कालच्या भेटीनंतर चित्र पालटण्याची शक्यता आहे. भेटीनंतर ओबीसी नेत्यांचं काय म्हणणं आहे आणि त्यांना या विषयी काय वाटतं हे अद्याप स्पष्ट झालेल नाही आहे. तोपर्यंत तरी आंदोलनाचा निर्णय गुलदास्त्यात राहणार आहे.

राज्यात होणार 'ओबीसी बचाव' मेळावे

राज्यात आज पासून ठीकठिकाणी 'ओबीसी बचाव' मेळावे सुरु होणार आहेत. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत कामा नये आणि ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होऊ नये, अशी मागणी या एल्गार मेळाव्यातून केली जात आहे. या मेळाव्यामध्ये राज्य सरकारमधील मंत्री, आमदार देखील उपस्थित राहणार आहेत.

(Edited by Amol Sutar)

Yogesh Kedar, Prakash Shendge and Somnath Kashid.
Ambadas Danve: दानवेंच्या मुलाच्या लग्नात ठाकरे-शिंदे-फडणवीसांचे एकला चलो रे...!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com