काश्मीर फाईल्सवरुन हिंदूत्ववादी संघटना आक्रमक; भगव्या वस्त्रातच चित्रपट पाहण्याचा हट्ट

The kashmir Files| Hindu-muslim Politicss| वातावरण चिघळण्याची शक्यता
The Kashmir Files
The Kashmir Files Sarkarnama
Published on
Updated on

नाशिक : द काश्मीर फाईल्सवरुन (The kashmir Files) राज्यासह देशभरात एक वेगळेच वातावरण तयार झाल्याचे दिसत आहे. चित्रपटाच्या कथेवरुन एकीकडे राजकारण सुरु असताना दूसरीकडे नाशिकमध्ये (Nashik) काही हिंदूत्ववादी (Hinduttva) संघटना आक्रमक झाल्या आहेत. नाशिकमधील 10 आखाड्यांचे महंत एकत्र चित्रपट पाहणार आहेत, विशेष म्हणजे चित्रपट पाहण्यासाठी भगवे वस्त्र परिधान करून चित्रपटगृहात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे गोंधळ उडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिकमधील एका मॉलच्या मल्टिप्लेक्समध्ये 'कश्मीर फाइल्स' चित्रपट पहायला गेलेल्या काही महिलां भगव्या शॉल परिधान करुन आल्या होत्या. त्यामुळे चित्रपटगृह प्रशासनाने त्यांना प्रवेशद्वारावरच अडवत आपले भगवे उपरणे जमा करण्यास सांगितले. घटनेचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ३२ वर्षांपूर्वी काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण या चित्रपटात करण्यात आहे.

The Kashmir Files
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडूनही ‘जय श्रीराम’चा घोष

यानंतर ही माहिती बाहेर परसली आणि काही युवक चित्रपटगृहात आले. चित्रपट संपल्यानंतर त्यांनी महिलांकडे यासंदर्भात विचारणा केली, यावर महिलांनीही त्यांना चित्रपट गृह प्रशासनाने उपरणी बाहेर काढून ठेवण्यास सांगण्यात आल्याचे सांगितले. या घटनेमुळे चित्रपट गृहात काहीवेळ गोंधळ निर्माण झाला होता. नंतर, पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत हा वाद मिटवला, पण आता पुन्हा एकदा नाशिकमधील हिंदूत्ववादी संघटना सक्रीय झाल्या आहेत. भगवी शॉल परिधान करुनच चित्रपट पाहणार असल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये वातावरण चिघळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

काश्मिरी हिंदूंच्या नरसंहारावरचा 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. तेव्हापासून चित्रपट कमाईच्या बाबतीतही मोठी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे अनेक राज्य सरकारांनी चित्रपट करमुक्त केला आहे. या यादीत यूपी आणि हिमाचल प्रदेश, गुजरात, कनार्टक, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, गोवा और त्रिपुरा या राज्यामंध्ये काश्मीर फाइल्स चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. त्यानंतर यूपी आणि हिमाचल प्रदेश सरकारने 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com