Pachora News : मनोहर भिडेंच्या प्रतिमेला जोडे मारले!

Progressive organizations protested against Manohar Bhide at Pachora-विविध पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पाचोरा येथे मनोहर भिडे यांच्या प्रतिमेस जोडे मारले.
Agitation Against Bhide
Agitation Against BhideSarkarnama
Published on
Updated on

Protest against Bhide : विविध पुरोगामी संघटनातर्फे मनोहर भिडे यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात केलेल्या कपोलकल्पीत विधानाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी निषेधाच्या घोषणा देत भिडे यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. (Activists deemands action against Manohar Bhide on Mahatma Gandhi statement)

पाचोरा (Jalgaon) शहरात समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडीसह पुरोगामी संघटनांच्यावतीने मनोहर भिडे (Manohar Bhide) यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध करण्यात आला.

Agitation Against Bhide
Chandrakant Patil News : चंद्रकांत पाटील यांचा गुलाबरावांना घऱचा आहेर!

वादग्रस्त मनोहर भिडे सातत्याने राष्ट्रपुरूषांच्या विषयी अवमानजनक वक्तव्ये करीत असतात. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी त्यांनी नुकतेच अतिशय तथ्यहीन आणि कपोलकल्पीत विधान केले आहे. त्याविरोधात राज्यभरात निषेधाच्या प्रतिक्रीया उमटत आहेत.

त्यातून युवक तसेच समाजामध्ये गैरसमज तसेच गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची गरज आहे. सरकारने त्यांना पाठीशी घालू नये अन्यथा राज्य सरकारबाबत देखील लोकांच्या मनात तीव्र नाराजी पसरेल असा इशारा देण्यात आला.

Agitation Against Bhide
Ambadas Danve : महाविकास आघाडीचं ठरलं, पुन्हा वज्रमुठ सभा होणार | Shivsena UBT | Congress | NCP

याप्रसंगी किशोर डोंगरे, वासुदेव महाजन, शांताराम सपकाळे, सुनील शिंदे, खलील देशमुख, ॲड. अविनाश भालेराव, अझहर खान, अशोक मोरे, मनोहर जमदाडे, दीपक सोनवणे, ईश्वर डोंगरे, कपिल पाटील, विशाल बागूल, अरुण गायकवाड, राहुल साठे, के. एस. महाजन, खंडू सोनवणे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com