
Satish Kadam ACB case : बांधकाम व्यावसायिकाकडून चार लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश कदम याने त्याच्या एकूण उत्पन्नापेक्षा तब्बल 297 टक्के अधिक संपत्ती संपादित केल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे.
त्यानुसार मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सतीश कदम याच्या विरोधात उलवे पोलिस ठाण्यात अपसंपदा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
नवी मुंबईतील NRI पोलिस ठाण्याचा तत्कालीन वरिष्ठ पोलिस (Police) निरीक्षक सतीश कदम याला सप्टेंबरमध्ये महेश कुंभार या बांधकाम व्यावसायिकाकडून चार लाख रुपयांची लाच घेताना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने उलवे इथून अटक केली होती. त्या वेळी ACBच्या पथकाने उलवे येथील त्याच्या फॅल्टमधून मोठी रक्कम देखील जप्त केली होती.
प्राथमिक तपासात सतीश कदम याने गैरमार्गाने मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवल्याचे आढळून आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) महासंचालकाकडून त्याच्या संपत्तीची उघड चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पोलिस दलात दाखल झाल्यापासून सतीश कदम याने अतापर्यंतच्या कालावधीत (1 डिसेंबर 2013 ते 9 ऑक्टोबर 2024) जमवलेल्या संपत्तीची तपासणी ‘ACB’च्या मुंबई युनिटचे पोलिस निरीक्षक कृष्णा मेखले व त्यांच्या पथकाने केली.
सहा महिने सुरू असलेल्या या तपासणीत सतीश कदम याने त्याच्या उत्पन्नापेक्षा तब्बल तीन कोटी 48 लाख 40 हजार इतकी (297 टक्के) अपसंपदा केल्याचे आढळले आहे. आरोपी सतीश कदम याने नोकरीच्या कालावधीत पदाचा, अधिकाराचा गैरवापर करून स्वत:च्या आणि कुटुंबाच्या नावावर गैरमार्गाने सदरची संपत्ती कमावल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार ACBच्या मुंबई युनिटने उलवे पोलिस ठाण्यात सतीश कदम याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सतीश कदम याच्या नावे उलवे सेक्टर-23 मधील ऑर्चिड हाइट्समध्ये 701 व 704 हे दोन फ्लॅट आहेत. तुलसी वेदांत इंटरप्राइजेस एलएलपी यांच्यावतीने पत्नी व मुलगा यांच्या नावे वहाळ उलवे सेक्टर-25 येथे सुमारे 170 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड, सदनिका क्रमांक 701 मध्ये 82 हजार रुपये किमतीचे घरगुती सामान मिळून आले आहे.
तसेच 48 लाखांची रोख रक्कम सापडली होती. सदनिका क्रमांक 705 मध्ये तीन लाख 40 हजार रुपये किमतीचे घरगुती सामान मिळून आले होते. सतीश कदमच्या नावे कार, पत्नीच्या नावे कार, मुलाच्या नावे आलिशान कार, 245 ग्रॅम सोने सापडले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.