भाजप म्हणते नाशिकमध्ये जिहाद, मात्र पोलिसांचे दुर्लक्ष!

उच्चशिक्षित हिंदू तरुणीला लग्नासाठी जबरदस्ती करणाऱ्यावर कारवाईची मागणी.
BJP Office bearers at Satpur Police station

BJP Office bearers at Satpur Police station

Sarkarnama

Published on
Updated on

नाशिक : उच्चशिक्षित हिंदू तरुणीने लग्न करावे, यासाठी अविवाहित मुस्लिम तरुणाने तिची छेडछाड करतानाच मारहाण केली. यामुळे घाबरलेल्या तरुणीने मदतीसाठी शहर (Nashik) पोलिसांकडे धाव घेतली. संबंधित तरुणीच्या संरक्षणासाठी पुढाकार घेत भाजपने (BJP) पोलिसांशी (Police) चर्चा करत तरुणीला न्याय देण्याची मागणी केली. दरम्यान, या प्रकरणी रात्री पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला.

<div class="paragraphs"><p>BJP Office bearers at Satpur Police station</p></div>
मालेगाव स्फोटात गौप्यस्फोट; माजी IPS अधिकाऱ्याचे आर आर पाटलांकडे बोट!

तत्पूर्वी भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी रविवारी (ता. २) सकाळी सातपूर पोलिसांत धाव घेत तरुणीला न्याय देण्याची मागणी केली. तिच्या केसालाही धक्का लागल्यास भाजपतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. श्री. पालवे म्हणाले, ‘‘शनिवारी रात्री अकराच्या सुमारास कॉल आला. एका अविवाहित तरुणीला मुस्लिम तरुण विवाहासाठी त्रास देत असल्याचे सांगण्यात आले. संबंधित तरुणीची त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा नाही. तरीही, तो संपूर्ण कुटुंबालाच त्रास देत आहे. हा तरुण मुस्लिम असून, याबाबत त्याला अनेक वेळा नकारही दिला, पण तो तिला ब्लॅकमेल करतो आहे. तिच्या घरासमोर आत्महत्या करण्याची धमकी तो देत आहे. त्याने मुलीला मारहाणसुद्धा केली आहे. तिची भेट घेतली असता तिनेही त्याच्याशी लग्न करायचे नाही, असे सांगितले.’’

<div class="paragraphs"><p>BJP Office bearers at Satpur Police station</p></div>
धक्कादायक; `जीवना`साठी `त्या` रोज देतात मृत्यूला हुलकावणी!

नाशिक शहर पोलिसांशी संपर्क साधत संबंधित मुस्लिम तरुणावर कारवाई करावी, अशी मागणी त्या तरुणीने केली. पोलिस या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत होते. सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीत पीडित तरुणीची त्या तरुणाने तीन वेळा छेड काढली. त्याबाबत तरुणीने सरकारवाडा पोलिसांत तक्रार देऊनही पोलिसांनी साधी एनसी नोंदविली. दरम्यान, पोलिसांनी त्या तरुणाला अटक न केल्यास भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असा इशारा देताच पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. अ‍ॅट्रॉसिटीसह कोणते गुन्हे दाखल केले, याची पोलिस ठाण्यात येऊन माहिती घेतली जाईल. समाधान न झाल्यास आंदोलन केले जाईल, असे पालवे यांनी सांगितले. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पीडित मुलीची आई व भाऊ उपस्थित होते.

मुलीच्या तक्रारीबाबत वरिष्ठांसह सातपूर पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, कुणी कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी संबंधितावर कडक कारवाई केली जाईल.

-अश्विनी पाटील, महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक, सातपूर

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com