Radhakrishna Vikhe : महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघडा पाडा; मंत्री विखेंच्या भाजप शक्तीकेंद्र प्रमुखांना सूचना

Radhakrishna Vikhe held a meeting of BJP workers : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप नेते राधाकृष्ण विखे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची राहुरीत बैठक घेतली. महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघडा पाडा, यासाठी बूथ आणि शक्तीकेंद्र प्रमुखांनी कामाला लागण्याच्या सूचना केल्या.
Radhakrishna Vikhe
Radhakrishna VikheSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : "लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका पुन्हा होवू न देता, स्वतःच्या गावापासून काम सुरू करता. नकारात्मक प्रचाराला ताकदीने प्रत्युत्तर द्या. विरोधकांकडे आता भांडवलच राहिले नाही. महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघडा पाडा.

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना संघटनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन जा. विधानसभा निवडणुकीत महायुतीचे आणि आपले यश निश्चित आहे", असे म्हणत भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी नगर जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, बूथप्रमुख आणि शक्तीकेंद्र प्रमुखांमध्ये उत्साह भरला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्यावतीने (BJP) नगर जिल्‍ह्यातील पदाधिकारी, बुथप्रमुख, शक्‍तीकेंद्र प्रमुख यांची एकत्रित बैठक राहुरीत झाली. या बैठकीत मंत्री विखे यांनी महाविकास आघाडीवर थेट हल्ला चढवत भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. "लोकसभा निवडणुकीत स्थानिक पातळीवर पराभव पत्कारावा लागला, तरी देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा विराजमान झालेत. याचा सर्वांना अभिमान आहे. महाविकास आघाडीच्या नकारात्मक प्रचाराला आपण उत्तर देण्यास कमी पडलो. आता मात्र मागे हटायचे नाही. कामाला लागा. महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघडा पाडा. मी तुमच्या बरोबर आहे", असे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

Radhakrishna Vikhe
Maharashtra Sugar Factory : कोल्हे, थोपटेंसह विरोधकांना कडू डोस; राज्य सरकारकडून साखर कारखान्यांची कर्जकोंडी

'भाजपने विकासाचा रोड मॅप देशाला दिला आहे. हा कायम राखण्याची जबाबदारी भाजपचा नेता, कार्यकर्ता म्हणून तुमच्या आणि आपल्यावर आहे. नकारात्मक महाविकास आघाडीला (MVA) विकासापेक्षा सत्ता हवी आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे घेऊन स्वतःच्या गावापासून तयारीला लागा. समाज माध्यमांपेक्षा प्रत्यक्षात फिल्डवर उतरून काम करा. कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या बरोबर आहे', असे राधाकृष्ण विखे यांनी सांगून कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य भरले.

Radhakrishna Vikhe
Nilesh Lanke : लंकेंनी 'LCB'च्या हप्त्यांचं रेटकार्ड केलं जाहीर; भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आल्यानं 'LCB' पुरती घायाळ

जशाच तसे उत्तर द्या : सुजय विखे

विधानसभा निवडणुका जिंकायच्‍या असतील, तर सर्वांना मोठे मन ठेवावे लागेल. राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार आणण्‍यासाठी प्रत्येक आमदार आपला महत्‍वाचा आहे. लोकसभा निवडणुकीत केवळ अपप्रचार झाला. मागील पाच वर्षात केलेला विकास अवघ्‍या दोन महिन्‍यात कुठे वाहून गेला हे देखील समजले नाही. सत्‍ता आली, तरच कार्यकर्ते जिवंत राहतील यासाठी आपला लोकप्रतिनिधी महत्‍वाचा आहे, याकडे माजी खासदार सुजय विखे यांनी लक्ष वेधले. महायुती सरकार आले, तरच सामान्‍य माणसाला न्‍याय मिळेल, विकासाची कामे मार्गी लागतील, कोन काय भाषणबाजी करतयं याला माझ्या दृष्‍टिने महत्‍व नाही. मात्र कार्यकर्त्‍यांना दमबाजीची भाषा झालीच, तर जशासतसे उत्‍तर देण्‍यास मागेपुढे पाहू नका. तुमच्‍या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे, असे सुजय विखे यांनी कार्यकर्त्‍यांना आश्‍वासित केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com