Vikhe and Shah Meet : विखे पिता-पुत्राने दहा दिवसांत दुसऱ्यांदा घेतली अमित शाहांची भेट; 'या' चर्चेला उधाण!

Radhakrishna Vikhe and Amit Shah News : अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामागे विखे कनेक्शन असल्याचंही बोललं जात आहे, कारण...
Radhakrishna Vikhe and Amit Shah
Radhakrishna Vikhe and Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Ahmadnagar Political News : राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील या विखे पिता-पुत्रांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत मागील दहा दिवसांत दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. अमित शाह यांच्या भेटीमागे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे राज्यात प्रमोशन होणार असल्याचीही चर्चा आहे. तसेच, या भेटीत राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोंडीवरदेखील चर्चा झाल्याचे, खासदार सुजय विखे यांनी म्हटले आहे.

राज्यात या आठवड्याच्या सुरुवातीला काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत, भाजपमध्ये प्रवेश करत मोठा राजकीय भूकंप घडवला. एवढंच नाही तर त्यांनी भाजपकडून राज्यसभेचा अर्जदेखील भरला आहे. अशोक चव्हाण आणि राधाकृष्ण विखे(Radhakrishna Vikhe Patil) यांचे कौटुंबिक संबंध सर्वश्रुत आहेत. यामुळे चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामागे विखे कनेक्शन असल्याच्या चर्चेला जोर आहे. अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतावेळी विखे कोठेच समोर नव्हते. त्यामुळे विखे कनेक्शनच्या चर्चेला अधिकच जोर आला आहे.

राज्यात भाजपकडून राजकीय पक्षांच्या फोडाफोडीवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. असे असताना विखे पिता-पुत्रांनी दहा दिवसांत अमित शाह यांची दुसऱ्यांदा भेट घेतल्याने राज्यातील राजकीय विश्लेषकांकडून वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Radhakrishna Vikhe and Amit Shah
Aaditya Thackeray : "अमावस्या किंवा पौर्णिमा आली की मुख्यमंत्री चुपचाप गायब होतात, अन्...", ठाकरेंचं विधान

विखे पिता-पुत्र भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून पक्षासाठी विविध भूमिका बजावत आहेत. राज्यात भाजपसाठी मंत्री राधाकृष्ण विखे हे पडद्यामागून थिंक टँकच्या भूमिकेत असल्याचंही बोललं जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह(Amit Shah) यांच्यासह केंद्रातील अन्य मंत्र्यांकडे राधाकृष्ण विखे हे संपर्क ठेवून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री यांचे नगर जिल्ह्यातील विशेष करून नगर उत्तरमध्ये झालेले दौरे हे राधाकृष्ण विखे यांच्या पुढाकारातून झाले आहे.

उद्धव ठाकरे शिर्डी दौऱ्यावर येण्यापूर्वी आणि येऊन गेल्यानंतर विखे पिता-पुत्रांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. त्यामुळे विखे पिता-पुत्राचे हे दौरे नेमके कोणत्या हेतूने आहेत, याबाबत राजकीय चर्चा सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे मोठी जबाबदारी येणार असल्याचे संकेत आहेत. म्हणजेच भाजपमध्ये राधाकृष्ण विखे यांचे प्रमोशन होणार अशी चर्चा आहे.

Radhakrishna Vikhe and Amit Shah
Aaditya Thackeray News : पुन्हा मिठाचा खडा,'वंचित'ची ठाकरेंच्या बैठकीकडे पाठ

कांद्यावरील निर्यातबंदी उठवणार -

विखे पिता-पुत्रांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता 15 फेब्रुवारीला भेट घेतली. पहिल्या आणि आताच्या भेटीत कांद्यावर घातलेल्या निर्यातवरील बंदी उठवण्याची मागणी विखे पिता-पुत्रांनी लावून धरली आहे. कांद्यावरील निर्यातबंदी लवकरच उठवणार असल्याचे आश्वासन अमित शाह यांनी दिल्याचे खासदार सुजय विखे(Sujay Vikhe Patil) यांनी म्हटले आहे. तसेच या वेळी राज्यातील राजकीय घडामोडींवरदेखील सविस्तर चर्चा झाली असून, विविध राजकीय घटनांची माहिती अमित शाह यांनी घेतल्याचेही खासदार विखे यांनी म्हटले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com