Aaditya Thackeray : "अमावस्या किंवा पौर्णिमा आली की मुख्यमंत्री चुपचाप गायब होतात, अन्...", ठाकरेंचं विधान

Aaditya Thackeray On Eknath Shinde : "मुख्यमंत्री शेतकरी असल्याचं दाखवतात, पण..", असा हल्लाबोलही ठाकरेंनी केला आहे.
Aaditya Thackeray, Eknath Shinde
Aaditya Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दहा वर्षे मी त्यांच्याबरोबर ( एकनाथ शिंदे ) काम केलं आहे. मी त्यांच्या हालचाली पाहतो. अमावस्या आणि पौर्णिमा आली की ते शहराबाहेर पडतात. थेट शेती गाठतात किंवा पडघा शहरात जातात. अमावस्या आणि पौर्णिमेला शेतात कोणती कामे होतात? मी शहरातील मुलगा आहे. ग्रामीण भागातील शेतकरी याबद्दल सांगू शकतात, असा प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

Aaditya Thackeray, Eknath Shinde
Shiv Sena News : माजी मंत्री घोलपांनी वेळ साधली; अखेर ठाकरेंना जय महाराष्ट्र!

सिन्नर येथील संवाद मेळाव्यात आदित्य ठाकरे बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री शिंदे शेतकरी असण्यावरच आदित्य ठाकरेंनी सवाल उपस्थित केले. "सुटाबुटातील सरकार उद्योगपतींना सवलती देते. मात्र, शेतकऱ्यांना जेरीस आणते. मुख्यमंत्र्यांची महाशक्तीसमोर उभे राहण्याची क्षमता नसल्यानं ते शेतकऱ्यांसाठी काही मागू शकत नाहीत," असं टीकास्त्रही आदित्य ठाकरेंनी डागलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"मुख्यमंत्री शेतकरी असल्याचं दाखवतात. पण, मुख्यमंत्र्यांच्या गावात रस्ता नाही. शेतावर जाण्यासाठी रस्ता नाही. तेथे थेट दोन हेलिकॉप्टर उतरतात. राज्याच्या गरीब शेतकरी मुख्यमंत्र्यांचे हे चित्र आहे. खरं तर मुख्यमंत्री शेतात पिकवतात तरी काय, हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना समजले पाहिजे," असा खोचक प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

Aaditya Thackeray, Eknath Shinde
Ahmednagar News : शिवसेनेच्या नगरसेवकावर रोखली गावठी पिस्तूल, खटका दाबणार तेवढ्यात...

"शेतकरी हैराण झाले आहेत. बँकांकडून नोटिसा पाठवल्या जात आहेत. मात्र, याची जराही चिंता मुख्यमंत्र्यांना नाही. कारण ते अमावस्या आणि पौर्णिमेलाच शेती करतात. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांच्या हालचालींकडे लक्ष असते. आम्ही दहा वर्षे बरोबर कामही केले. साधारणत: अमावस्या किंवा पौर्णिमा आली की ते शहरातून चुपचाप गायब होतात. यानंतर ते शेतीवर जातात. येथे नाही तर पडघा शहर गाठतात. आता अमावस्या आणि पौर्णिमेला शेतात कोणती कामे होतात," असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

Aaditya Thackeray, Eknath Shinde
Igatpuri Politics : युती-आघाडीमुळे उमेदवारांची कोंडी; विधानसभेसाठी शह-काटशहाचं राजकारण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com