Nagar News : विखेंच्या बालेकिल्ल्यात 'भावी मुख्यमंत्री' म्हणून थोरातांचे बॅनर; भाजप नेते झळकले

Ahmednagar Politics : कोपरगाव मतदारसंघात कोल्हे विरुद्ध काळे यांच्यात युद्ध रंगलं आहे. त्याला मंत्री विखे अन् आमदारांचे बळ मिळत आहे.
radhakrishna vikhe patil balasaheb thorat cm banner
radhakrishna vikhe patil balasaheb thorat cm banner sarkarnama
Published on
Updated on

राज्यात सध्या अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाबरोबर जात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण, सतत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू असतात. अशातच नगरमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे ( Radhakrishna Wikhe ) यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांच्या वाढदिवसनिमित्त बॅनर लागले आहेत. त्यावर 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख करण्यात असून भाजप नेत्यांचे फोटो झळकले आहेत.

radhakrishna vikhe patil balasaheb thorat cm banner
Dharashiv Loksabha 2024 : काका मला खासदार करा, पुतण्याची इच्छा तानाजी सावंत पूर्ण करणार?

गणेश सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं बाळासाहेब थोरातांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावण्यात आले आहेत. या फलकावर भाजपच्या ( Bjp ) प्रदेश सचिव आणि कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे त्यांचे पती बिपीन कोल्हे आणि पुत्र विवेक कोल्हे यांचेही फोटो असल्यानं तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

radhakrishna vikhe patil balasaheb thorat cm banner
Sharad Mohol Case : मोहोळ खून प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक, सहा ऑडिओ क्लिप संशयास्पद आढळल्या

पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या बालेकिल्ल्यात अर्थात शिर्डी विधानसभा मतदारसंघातील ( Shirdi Loksabha constituency ) राहाता शहरात थोरातांच्या वाढदिवसाचे बॅनर आणि त्यावर 'भावी मुख्यमंत्री' उल्लेख असल्यानं शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. 'आपल्या कार्यकर्तुत्वाने अवघा महाराष्ट्र व्यापून टाकणारे विकासरत्न,' असा आशय लिहून बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश साखर कारखाना सभासदांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.

बॅनरवर विखेंचे भाजपअंतर्गत विरोधक कोल्हे कुटुंबियांचे छायाचित्र असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कोपरगाव आणि राहाता मतदारसंघात विखे-कोल्हे यांच्यात राजकीय शीतयुद्ध तीव्र होताना दिसत आहे. कोल्हे परिवाराने बाळासाहेब थोरातांबरोबर राजकीय चूल मांडली आहे. त्यामुळे कोपरगाव मतदारसंघात कोल्हेंचे पांरपारिक राजकीय प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील आमदार आशुतोष काळे यांनी मंत्री विखेंशी जवळीक साधली आहे.

radhakrishna vikhe patil balasaheb thorat cm banner
Kalyan Dombivli : आयुक्त दालनाबाहेर राडा! पालिका कर्मचाऱ्यास सुरक्षारक्षकांनी केली मारहाण

यातून राजकीय कुरघोड्यांचे राजकारण सध्या कोल्हे आणि काळे यांच्यात रंगले आहे. या दोघांच्या राजकारणाला मंत्री विखे आणि आमदार थोरात यांचे बळ मिळत आहे. यातून मंत्री विखे आणि आमदार थोरात यांच्यातील राजकीय द्वंद वाढू लागले आहे.

( Edited By : Akshay Sabale )

radhakrishna vikhe patil balasaheb thorat cm banner
Sharad Pawar News : पक्ष, चिन्ह गेल्यानं पवारसाहेबांची अशी असेल पुढची लढाई…

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com