Sharad Mohol Case : मोहोळ खून प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक, सहा ऑडिओ क्लिप संशयास्पद आढळल्या

Pune Police On Sharad Mohol Case : मोहोळ खून प्रकरणात आणखी आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता पुणे पोलिसांनी वर्तवली आहे.
Sharad Mohol Case
Sharad Mohol CaseSarkarnama
Published on
Updated on

Pune News : गुंड शरद मोहोळ खून ( Sharad Mohol ) प्रकरणात पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. मोहोळ खून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे 18 हजार 827 ऑडिओ क्लिप ताब्यात घेतल्या आहेत. त्यापैकी आतापर्यंत 10 हजार 500 क्लिप तपासल्या आहेत. यातील सहा ऑडिओ क्लिप संशयास्पद आढळून आल्या असल्याचे तपासात समोर आले आहे.

Sharad Mohol Case
Kalyan Dombivli : आयुक्त दालनाबाहेर राडा! पालिका कर्मचाऱ्यास सुरक्षारक्षकांनी केली मारहाण

शरद मोहोळ खून प्रकरणात गुन्हे शाखेनं ( Pune Police ) आणखी एकाला अटक केली आहे. अभिजीत अरुण मानकर ( 31 वर्ष ) असं अटक करण्यात आलेल्या तरूणाचं नाव आहे. तो दत्तवाडी येथील रहिवाशी आहे. मंगळवारी ( 6 फेब्रुवारी ) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. या खून प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 16 जणांना अटक केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासगी रूग्णालयात मोहोळचा मृत्यू

कोथरुड येथील सुतारदरा भागात 5 जानेवारीला कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा खून करण्यात आला होता. त्याच्याच गँगमधील साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून मोहोळचा खून केला होता.

भरदिवसा हा प्रकार घडल्यानं या परिसरासह संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या मोहोळला जवळच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण, उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला.

Sharad Mohol Case
NCP Crisis : "निवडणूक आयोगाचा निकाल अनपेक्षित होता, कारण...", जयंत पाटलांची प्रतिक्रिया

पूर्वनियोजित कट करून खून

या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने पावले उचलत हल्लेखोरांना शोधण्यासाठी पथके तयार करून वेगवेगळ्या भागात पाठवली होती. खुनाच्या घटनेनंतर अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांच्या गुन्हे शाखेनं हल्लेखोर आणि कटात सहभागी असणाऱ्यांना अटक केली आहे. हा खून पूर्वनियोजित कट करून करण्यात आल्याचे समोर आलं होतं. यामध्ये दोन वकिलांचा देखील सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर गुन्हे शाखेने त्यांना देखील अटक केली आहे.

Sharad Mohol Case
Eknath Shinde : शिंदे तेव्हा साधुसंत होते आणि आता गुंड झाले का? गुलाबराव पाटलांचा सवाल

"१० हजार ऑडिओ क्लिप पोलिसांनी तपासल्या"

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे म्हणाले, "अटक करण्यात आलेल्या आरोपींची आणि इतर काही जणांची संभाषणे झाली होती. अशा तब्बल 18 हजार 827 ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. त्यापैकी 10 हजार 500 ऑडिओ क्लिप पोलिसांनी आतापर्यंत तपासल्या आहेत. त्यापैकी सहा क्लिप या संशयास्पद आढळून आल्या आहेत."

Sharad Mohol Case
Parbhani Loksabha : राजेश विटेकरांसाठी जोर लावणाऱ्या अजितदादांना परभणीत माघार घ्यावी लागणार ?

"तपासादरम्यान साहिल पोळेकर आणि नामदेव कानगुडेमधील संभाषणात अभिजीत मानकर याचे नाव समोर आले. या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी काही आरोपींची नावे समोर येतील," असंही उपायुक्त झेंडेंनी सांगितलं.

Sharad Mohol Case
Lok Sabha Election 2024 : महायुती, महाविकास आघाडीचे ठरेना; शांतिगिरी महाराजांची यंत्रणा कामाला...

आतापर्यंत 16 जणांना अटक

गुंड मोहोळ खून प्रकरणात मुख्य आरोपी साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, याच्यासह यापूर्वी नामदेव कानगुडे, अमित ऊर्फ अमर कानगुडे, अ‍ॅड. रवींद्र पवार, अ‍ॅड. संजय उडान, चंद्रकांत शेळके, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय वटकर, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले, विठ्ठल शेलार, सतीश शेडगे, नितीन खैरे, आदित्य गोळे, संतोष कुरपे आणि गणेश मारणे यांना अटक झाली आहे. या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Sharad Mohol Case
Naveen Patnaik News : बाबासाहेब आंबेडकरांचे नावे मुख्यमंत्र्यांची 'नवीन' खेळी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com