Radhakrishna Vikhe Patil : मोदींचा आदेश विखे-पाटलांनी कोपरगावात राबवला; श्रीरामाचा गजर करीत म्हणाले...

Ayodhya Ram Temple : विखे-पाटलांची कोपरगावातील मंदिरात सफाई, प्रसादाची सेवा
Radhakrishna Vikhe
Radhakrishna VikheSarkarnama

मोबीन खान

Ahmednagar Political News : अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सोहळ्यापूर्वी देशभरातील मंदिरांची स्वच्छता करण्याचे आवाहन केलेले आहे. त्यानुसार भाजपचे मंत्री आणि नेते स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. नगर जिल्ह्यातील कोपरगावमधील शनी मंदिरात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांनी मंदिराची स्वच्छता केली. यावेळी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनीही स्वच्छ्ता केली.

विखे-पाटलांचे कोपरगाव शहरात आगमन होताच आमदार काळे आणि माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर विखे-पाटलांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर शनी मंदिरात दर्शन घेऊन मंदिर परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. यावेळी विखे-पाटलांनी जय श्रीरामचा जयघोष केला. त्यानंतर वीर सावरकर चौकात फलकाचे अनावरण करून गुरुद्वारा येथे दर्शन घेतले.

Radhakrishna Vikhe
Manoj Jarange And Bacchu Kadu : आधी सरकारकडून शिष्टाई, आता थेट आंदोलनातच उडी; बच्चू कडूंची भूमिका काय?

२२ तारीख सुवर्णाक्षरात लिहिली जाईल

कोपरगावात बोलतना राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe) म्हणाले, २२ तारखेचा क्षण सुवर्णाक्षरात लिहिला जाईल. जगभरात असलेल्या कोट्यवधी रामभक्तांच्या मनात आनंद आहे. राज्य सरकारने सुटी जाहीर केली. प्रत्येक नागरिक पुढाकार घेऊन घरासमोर रांगोळी काढणे, गुढी उभारणार आहे. राम मंदिर होत असल्याने देशभरातील नागरिकांचा आनंद गगनात मावेना झाला आहे. या दिवशी नागरिकांनी दिवाळी साजरी करावी, असेही आवाहन विखेंनी केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीच्या सर्व उमेदवारांची गॅरंटी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देशाची अर्थव्यवस्था जगात पहिल्या तीन क्रमांकावर नेण्याची गॅरंटी दिली आहे. याच धर्तीवर विखे-पाटलांनीही मोठी गॅरंटी यावेळी दिली. ते म्हणाले, शिर्डी लोकसभेसाठी महायुती जो निर्णय घेईल तो पक्षाचे कार्यकर्ते मान्य करतील. दक्षिणेत राधाकृष्ण विखे निवडणूक लढणार, अशी चर्चा आहे. चर्चा तर सर्वबाबतीत असते. मात्र महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवणार आहोत. तसेच महायुतीचे जे उमेदवार असतील त्यांची सर्वांची गॅरंटी मी घेणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Radhakrishna Vikhe
Abhijit Bichukale : उदयनराजेंचा कट्टर विरोधक म्हणाला, 'महाराष्ट्र माझा आणि मी मोदी साहेबांचा फॅन'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com