भाजपमध्ये कुणाला प्रवेश द्यायचा हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. काही लोकांनी थेट भाजपमध्ये येण्याची भूमिका घेतली. मात्र, नगर जिल्ह्यातील काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात, असा धक्कादायक दावा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला आहे. विखे पाटलांनी हा बाळासाहेब थोरातांना (Balasaheb Thorat) टोला लगावल्याचीही शहरात चर्चा आहे.
शिवजयंतीनिमित्त मंत्री विखे यांनी (Radhakrishna Vikhe) त्यांच्या मतदारसंघातील राहाता शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना वरील दावा केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेऊन मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याची भूमिका जाहीर केली आहे. आमची सर्वांची तीच भूमिका आहे. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. मराठा समाज मागासलेला असल्याचे सॅम्पल सर्व्हेत सिद्ध होत आहे. उद्याच्या (20 फेब्रुवारी) विशेष अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षणाचा ठराव आम्ही आणतोय. सर्व राजकीय पक्ष पाठिंबा देतील आणि ठराव एकमताने मंजूर होईल, अशी अपेक्षा विखे-पाटील यांनी व्यक्त केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सुप्रिया सुळे (Supriya Sule) काय म्हणतात त्याला मी महत्त्व देत नाही. त्यांचे वडील अनेक वर्षे केंद्रात कृषिमंत्री होते. शेतीमालाच्या भावाला स्थिरता यावी म्हणून त्यांनी काय प्रयत्न केले ते सांगावे. सूचना करणे सोपे आहे. मात्र, जेव्हा सत्तेत असताना संधी होती, त्यावेळी मात्र शेतकरी दिसला नाही, या शब्दांत विखेंनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला.
कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) उठवण्यासंदर्भात भारत सरकारने आमची मागणी मान्य केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेदेखील निर्यातबंदी उठवण्यासाठी प्रयत्नशील होते. यापुढे दलालांमार्फत खरेदीपेक्षा शेतकऱ्यांना थेट कांदा निर्यात करण्याला परवानगी देण्याचा सरकारचा विचार सुरू असून, आम्ही केलेल्या प्रयत्नांना यश आल्याच विखे यांनी म्हटले आहे.
(Edited by Avinash Chandane)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.