Shirdi Lok Sabha Constituency: मोठी बातमी : खासदार लोखंडेंना भाजपचा शिर्डीतून विरोध

Maharashtra Politics: भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गटाची घुसमट वाढणार
Sadashiv Lokhande News
Sadashiv Lokhande NewsSarkarnama
Published on
Updated on

Nagar: शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजपमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. नेवासा भाजप किसान मोर्चाने शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना विरोध दर्शवला आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत.

राज्यात भाजप महायुतीचे सरकार आहे. भाजप-शिवसेना एकनाथ शिंदे-राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्र आहेत. महायुतीत जागावाटप निश्चित झालेले नाही. तरीदेखील विद्यमान खासदार आपली उमेदवारी निश्चित समजून कामाला लागले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार सदाशिव लोखंडे यांनीदेखील शिर्डी लोकसभा मतदारसंघातून जोर लावला आहे, परंतु भाजपच्या किसान मोर्चाने खासदार लोखंडे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. याबाबत किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे यांनी थेट शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे. भाजपच्या किसान मोर्चाने घेतलेल्या या भूमिकेमुळे खासदार लोखंडे यांच्यासमोर अडचणी वाढल्या आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे.

Sadashiv Lokhande News
Nitesh Rane: देवरा, चव्हाणांनंतर काँग्रेसचा आणखी एक बडा नेता भाजपच्या वाटेवर; राणेंचं सूचक टि्वट

मतदारसंघामध्ये प्रचंड नाराजी

खासदार लोखंडे नेहमीच होत असलेल्या आरोपावरून भाजपच्या किसान मोर्चाने त्यांची कोंडी केली आहे. खासदार लोखंडे हे कधीच संपर्कात नसतात. ते भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांशी संपर्कात नसतात. फक्त ठेकेदारांशी सतत ऊठबस असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून आणि बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या निष्ठावान शिवसैनिकांनी त्यांना दोन वेळेस संसदेत पाठवले. मात्र, गेल्या १० वर्षांत मतदारसंघात म्हणावा असा विकास झालेले नाही. मतदारसंघात अतिवृष्टी झाली आता दुष्काळ पडला. अशा काळात मतदारसंघात राहून कार्यकर्त्यांमार्फत लोकांपर्यंत जायचे असते, परंतु खासदार लोखंडे हे संपर्कात नसल्याने मतदारसंघामध्ये प्रचंड नाराजी आहे.

लोखंडेंना पुन्हा उमेदवारी देऊ नका

किसान मोर्चाने पत्रात पुढे गंभीर आरोप केला आहे. खासदार लोखंडे यांचे विरोधकांशी साटेलोटे आहे. पु्न्हा त्यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा पराभव होऊ शकतो. शिर्डी मतदारसंघात शिवसेनेला पराभव टाळायचा असेल, तर कुठल्याही परिस्थित लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी देऊ नका, अशी मागणी अंकुश काळे यांनी पत्रातून केली आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

Sadashiv Lokhande News
CM Shinde Sangli Tour : जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री उतरणार; शिवसेनेकडून जोरदार तयारी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com