Radhakrishna Vikhe On Congress : काँग्रेसकडून 'खटाखट' घ्या; मंत्री विखेंनी ठोकला शड्डू!

Radhakrishna Vikhe Raised The Issue In The Congress Manifesto : लोकसभेतील अपयश विरोधकांच्या नॅरेटिव्हमुळे आले. यातच कांदा आणि दूध दरवाढीच्या मुद्दांचा फटका बसला. या मुद्यांवर आपण काम सुरू केले असून, कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या तयारी लागावे, अशा सूचना भाजप नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केल्या.
Radhakrishna Vikhe
Radhakrishna Vikhe Sarkarnama
Published on
Updated on

Radhakrishna Vikhe News : भाजप नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे नगर जिल्ह्यात महायुतीला मिळालेले अपयशाची जबाबदारी घेत विधानसभा निवडणुकीत उणिवा दूर करणार असल्याचे सांगितले. लोकसभेत कार्यकर्ते आणि पदाधिकारी केलेल्या कामाचे कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाची गॅरंटी दिली. ती पूर्ण होणारच! पण काँग्रेसने महिलांना महिन्याला साडेआठ हजार रुपये खटाखट देण्याचे आवाहन पूर्ण होणार का? असा प्रश्न करत मंत्री विखे यांनी काँग्रेसला घेरले.

राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी आपल्या राजकीय वाटचालीचे श्रेय कार्यकर्ते आणि साथीदारांना दिले. संघर्ष आणि मी बरोबरच असतो. त्यातून शिकतो. अपयशातून नवीन शिकतो. नाउमेद होत नाही. उणिवा दूर करून पुन्हा नव्याने भरारी घेऊ. या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासाची गॅरंटी आपल्याबरोबर आहे, असे सांगून काँग्रेसने आपल्या घोषणापत्रात महिलांना महिन्याला साडेआठ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचे काय? आता मताभगिनींनी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आणि आमदारांच्या दारात जाऊन त्यांच्याकडे गॅरंटीचे पैसे खटाखट मागावेत, असे मंत्री विखे यांनी म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला.

Radhakrishna Vikhe
Ajit Pawar, Rohit Pawar and Ram Shinde : अजित पवार 'किंगमेकर', आघाडीत पवार इज 'पाॅवर' अन् महायुतीच्या गर्दीत 'राम शिंदे'; काय आहे गणित...

देशाचे उज्ज्वल भविष्याची वाटचाल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. समजाच्या प्रत्येक घटकाच्या भविष्यासाठी विकासाची गॅरंटी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली होती. ती पूर्ण होत आहे. त्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला आणि तुम्हाला मिळत आहे, असेही मंत्री विखे यांनी सांगितले. श्रीरामपूर येथे वाढदिवसानिमित्ताने मंत्री विखे यांचा अभीष्टचिंतन सोहळ्यात भाजपचे नगर उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, नितीन दिनकर, दीपक पटारे, शरद नवले उपस्थित होते.

Radhakrishna Vikhe
Satyajeet Tambe : सत्यजीत तांबेंचा मोठा आरोप; ''NEET' परीक्षेत एक नव्हे तर, चार घोटाळे'

मंत्री विखे म्हणाले, "आगामी काळात नगर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वात पहिले प्राधान्य युवकांना रोजगार देण्याचे असेल. त्यासाठी युवकांना मोफत प्रशिक्षण आणि महिन्याला स्टायपेंड देण्याची व्यवस्था करणार आहोत. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना चांगले मताधिक्य मिळाले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना चांगले यश मिळेल".

महायुतीच्या कार्यकर्त्यांनी त्यादृष्टीने कामाला लागावे. राज्यात शेतकऱ्यांच्या शेतमाल भाव, कांदा व दूध दराचा प्रश्न यांचा फटका महायुतीला बसला आहे. आपण काम करत राहिलो. मात्र महाविकास आघाडीचे लोक मोकळे असल्यामुळे त्यांनी नकारात्मक प्रचारात आघाडी घेतली. त्यांना त्याच्यात यश मिळाले. तीच भूमिका विधानसभेतही राहू शकते, असे मंत्री विखे यांनी म्हटले.   

नगरबरोबरच शिर्डी आणि श्रीरामपूरच्या एमआयडीसीचा विस्तार होत आहे. श्रीरामपूरच्या एमआयडीसीमध्ये दोन मोठे प्रकल्प आणण्याचा आपला प्रयत्न आहे. यातून तालुक्यातील युवकांना रोजगार उपलब्ध होतील, असेही मंत्री विखे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com