Rahata Shree Ganesh Sugar Factory Case : पुन्हा एकदा 'श्रीगणेश'विरूद्ध विखे कारखाना 'सर्वोच्च' लढाई; तीन वर्षांपूर्वीच्या निवडणुकीला पुन्हा उजाळा!

Hearing scheduled in Supreme Court on April 21, 2026, over contract dispute involving Rahata Shree Ganesh Cooperative Sugar Factory and Dr. Vikhe Patil group : राहाता इथल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या करारावरून डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Shree Ganesh Sugar Factory
Shree Ganesh Sugar Factory Sarkarnama
Published on
Updated on

Rahata sugar factory dispute : तीन वर्षांपूर्वी श्रीगणेश सहकारी कारखाना निवडणुकीत, थोरात-कोल्हे यांनी एकत्र येत विखे पाटील यांना पराभवाचा धक्का दिला. होम ग्राऊंडवर झालेला हा पराभव, विखे पाटील यांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय.

या निवडणुकीबरोबरच श्रीगणेश सहकारी साखर कारखाना हा पूर्वीच्या करारातून बाहेर पडला. श्रीगणेश कारखान्याचा हा करार विखे पाटील कारखान्याशी होता. याच करारावर, विखे पाटील कारखान्याने पुन्हा श्रीगणेश कारखान्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या याचिकेवरील पहिली सुनावणी उद्या मंगळवारी (ता. 21) होत आहे.

राहाता तालुक्यातील श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याची (Sugar Factory) तीन वर्षांपूर्वी निवडणूक झाली अन्, पूर्वीच्या करारातून बाहेर येत, निवडणुकीबरोबरच कारखाना पुन्हा सभासदांच्या ताब्यात आला. थोरात-कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा कारभार वेग धरत आहे. विशेष म्हणजे, श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र राज्य सरकारकडून 74 कोटी रुपयांचे मार्जिन मनी कर्ज देखील मंजूर झालं आहे.

डॉ. विखे पाटील कारखान्याकडून श्रीगणेशविरोधात पुन्हा न्यायालयीन लढाई सुरू करत, थेट सर्वोच्च न्यायालयात (Court) खेचलं आहे. यावरून पुन्हा एकदा डॉ. विखे पाटील कारखान्याच्या याचिकेवर चर्चांना तोंड फुटलं आहे. श्रीगणेश कारखान्याला अडचणीत आणण्याच्या हेतूने विविध पातळ्यांवर त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप श्रीगणेशकडून सुरू झाला आहे.

Shree Ganesh Sugar Factory
Newasa firing case : मुख्याधिकाऱ्यावर गोळीबार! केजरीवालांच्या नेत्यावर गुन्हा; राजकारणात खळबळ, दिल्लीपासून गल्लीपर्यंत चर्चा

यापूर्वी याच मुद्यावर, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने ही याचिका तथ्यहीन ठरवत फेटाळून लावली होती. पुणे जिल्हा न्यायालयात व साखर आयुक्त पुणे यांचे समोर संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

Shree Ganesh Sugar Factory
Yavatmal Missing Girls Case : गायब 34 मुलींचं गूढ गहिरे! पोलिसांना सापडला ‘फसवणूक’ अँगल; संशयिताच्या घरावर संतप्त जमावाची दगडफेक

न्यायालयाच्या स्पष्ट निर्णयानंतरही, डाॅ. विखे पाटील कारखान्याने श्रीगणेशला सर्वोच्च न्यायालयात घेऊन, जाण्याचा मार्ग निवडला आहे. या न्यायालयीन संघर्षामुळे कुठेतरी छुप्यापद्धतीने विखेपाटील आणि थोरात-कोल्हे यांच्यातील राजकीय संघर्ष वाढणार असल्याचे संकेत असल्याचे मानले जात आहे.

औरंगाबाद खंडपीठाने ही याचिका फेटाळली असली आहे. तरी देखील पुन्हा सर्वोच्च न्यायालयात श्रीगणेश कारखान्याविरोधात याचिका दाखल करून, अडचणी वाढवल्या जात आहे, असा सूर श्रीगणेशच्या सभासदांमध्ये आहे. या याचिकेवरील पहिली सुनावणी उद्या मंगळवारी (ता. 21) होत असून, तिच्याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com