
Nashik court grants bail to Rahul Gandhi in Savarkar defamation case : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयीचे वक्तव्य याबाबत विविध खटले सुरू आहेत. यातील एक खटला नाशिकच्या न्यायालयात देखील सुरू आहे. या खटल्याची सुनावणी गुरुवारी झाली.
राहुल यांनी नाशिकच्या सभेत केलेल्या वक्तव्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेबाबत नकारात्मक भावना निर्माण झाल्याचा दावा सावरकर अनुयायांनी केला होता. त्या विरोधात देवेंद्र भुतडा यांनी राहुल यांच्या विरोधात मानहानीचा दावा केला आहे. या खटल्यात न्यायालयाने समन्स बजावली होते. या नियमित कायदेशीर प्रक्रियेत गुरुवारी झालेल्या सुनावणीत राहुल गांधी प्रत्यक्ष उपस्थित नव्हते.
न्यायालयाच्या सुनावणीसाठी राहुल गांधी नाशिकला येणार का? याबाबत मोठे उत्सुकता होती. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही राहुल गांधी नाशिकला येणार अशी अपेक्षा होती. मात्र न्यायालयाने ऑनलाईन सहभागी होण्यास मान्यता दिल्याने राहुल गांधी यांचा नाशिक दौरा टाळला.
याचिका करते भुतडा यांचे वकील मनोज पिंगळे यांनी राहुल गांधी यांना न्यायालयात उपस्थित राहावे लागेल. कायदेशीर तरतुदीनुसार राहुल गांधी यांना न्यायालयात अनुपस्थित राहण्याची सूट देऊ नये, अशी विनंती केली होती.
यासंदर्भात राहुल गांधी यांच्या वतीने ॲड. अविनाश भिडे यांनी गांधी यांची न्यायालयात उपस्थिती विविध कारणांमुळे अशक्य असल्याचे सांगितले. त्यानंतर झालेल्या चर्चेनुसार गुरुवारी राहुल गांधी न्यायालयाच्या कामकाजात ऑनलाइन सहभागी झाले. त्यात न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. या पुढील सुनावणीत राहुल गांधी यांची उपस्थिती बंधनकारक नसेल.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी राहुल गांधी यांनी यापूर्वीही आपली मते मांडली आहेत. सावरकर अनुयायी त्याबाबत नाराज असल्याने आणि विशेषतः हिंदुत्ववादी संघटनांकडून त्याला विरोध होत आहे. त्यामुळे देशाच्या विविध न्यायालयांमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात भिवंडी येथील न्यायालयात देखील राहुल गांधी यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. या खटल्याच्या सुनावणीला हजर राहिल्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. ही सर्व नियमित कायदेशीर प्रक्रिया आहे.
एकंदर या खटल्यांमध्ये राहुल गांधी यांनी आपली भूमिका कायम ठेवत कोणत्याही परिस्थितीत सावरकर यांच्या विषयीची मते आणि भूमिका यावर आपण ठाम असल्याचे सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यात मात्र गांधी यांना सावरकर यांच्या वक्तव्य विषयी खडसावलेले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.