
थोडक्यात बातमीचा सारांश :
हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या भावाने काम पूर्ण झाल्याचे आणि बिल प्रलंबित असल्याचे स्पष्ट केले आहे.
चिंचोली येथील पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली असून संबंधित कोनशिला देखील याची साक्ष देते, असा दावा अक्षय पाटील यांनी केला.
कामाचे मोजमाप व अंतिम देयक विभागाकडून जिल्हा परिषदेकडे सादर न झाल्यामुळे उर्वरित रक्कम अडकली असल्याचे त्यांनी सांगितले.
Sangli News : सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या कामाचे देयक न मिळाल्याने हर्षल पाटील या उप कंत्राटदाराने आत्महत्या केली होती. या प्रकरणामुळे राज्यातील वारावरण तापले असून राज्य सरकारने हात झटकले आहेत. दरम्यान मयत हर्षल पाटील याचे सख्खे भाऊ अक्षय पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी "झाले एवढे बस झालं... किमान आता तरी" असे म्हणत उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.
सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या कामाचे देयक न मिळाल्याने हर्षल पाटील या उप कंत्राटदाराने आत्महत्या केली होती. या प्रकरणामुळे राज्यातील वारावरण तापले आहे. विरोधकांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे. तर कंत्राटदारांचे थकीत देय न दिल्यानेच कंत्राटदाराला आत्महत्याचे पाऊल उचलावे लागल्याचा आरोप राज्य कंत्राटदार संघटनेनं केला आहे.
तर हा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील धुडकावला आहे. त्यांनी हर्षल पाटील सरकारी कंत्राटदार नाही. त्याला जिल्हा परिषदेनं कोणतेचं काम दिलं नाही असा खुलासा केला. तसेच याबाबत जिल्हा परिषदेनं देखील प्रसिद्ध पत्रक देत खुलासा केला आहे. ज्यात हर्षल पाटील हे कंत्राटदार नसल्याचे म्हटलं असून त्यांना जि.प.कडून कोणतेच कामन देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांचे देयक देण्याचा संबंध येत नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चिंचोली येथील जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाच्या कोनशिलेवर हर्षद पाटील आणि अक्षय पाटील या दोन ठेकेदारांचीच नावे आहेत. अक्षय पाटील हा मूळ ठेकेदार असून हर्षद पाटील याचा भाऊ आहे. हे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. मात्र जिल्हा परिषदेकडून या कामाचे देय अद्याप देण्यात आलेले नाही. या कामाची निविदा 44. 72 लाखांना काढण्यात आली होती. हे काम कंत्राटदार म्हणून अक्षय पाटील यांनी घेतले होते. जे पूर्ण झाले आहे. ज्याचे देय जिल्हा परिषदेनं 25. 63 लाख दिले आहेत. पण अद्याप 19 लाख 09 हजार रुपये देय देणं बाकी आहे. पण अजितदादा, गुलाबराव पाटील आणि सांगली जिल्हा परिषद मात्र हर्षल पाटील कंत्राटदार असल्याचे मान्य करायला तयार नाहीत.
दरम्यान आता या प्रकरणात हर्षल पाटील यांच्या चुलत बंधूने, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानंतर आमच्यावर ओढावलेल्या दुःखाचे भाव ठेवून आम्ही बोलत असून त्यांनी देखील बोलताना भान ठेवलं पाहिजे. हर्षल पाटील यांनी सबकॉन्ट्रॅक्ट घेतलं म्हणजे तुमचं काम केलं नाही का? काम पूर्ण झालं नाही का? त्याचं बिल सरकारच देणार ना? अशी विचारणा केली होती.
यापाठोपाठ आता हर्षल पाटील यांच्या सख्खे भाऊ अक्षय पाटील यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय पाटील यांनी, "झाले एवढे बस झालं...आमचा भाऊ गेला. आमची मानसिकताही आता काहीच बोलण्याची नाही. त्यामुळे मीडिया किंवा राजकीय आरोप प्रत्यारोप बाबत काहीच बोलायचं नाही. पण चिंचोली (ता. शिराळा) येथील पाणीपुरवठा योजनेचे काम आमच्याकडून पूर्ण झाले आहे. हे कोणी नाकारू शकतं नाही. त्याबाबत तेथील कोनशिला देखील बोलेल. पण जे काम झालं आहे. त्याचे मोजमाप व बिल पूर्तता करणेकामी संबधित विभागाकडून जिल्हा परिषदेकडे वर्ग करणे महत्त्वाचे होते. त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. अंतिम देयक विभागाकडून सादर न झाल्यामुळे उर्वरित रक्कम अद्याप मिळालेली नसल्याचा दावा अक्षय पाटील यांनी केला आहे.
1. हर्षल पाटील यांची आत्महत्या का झाली?
– जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामाचे बिले वेळेवर न मिळाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे.
2. त्यांच्या भावाने काय सांगितले?
– अक्षय पाटील यांनी सांगितले की चिंचोली येथील पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यात आली असून अंतिम देयक विभागाकडून सादर न झाल्यामुळे पैसे मिळाले नाहीत.
3. सरकार यावर काय म्हणतं?
– सरकारने सांगितले की हर्षल पाटील यांच्याशी थेट कोणताही करार नव्हता, त्यामुळे सरकारला पैसे देण्याची जबाबदारी नाही.
4. कोनशिला म्हणजे काय?
– कोनशिला म्हणजे सरकारी प्रकल्पाच्या सुरुवातीस ठेवलेली दगडावरील माहितीफलक, जी प्रकल्पाची अधिकृतता दाखवते.
5. पुढे काय होणार आहे?
– प्रकरणाची चौकशी सुरू आहे. संबंधित विभाग व जिल्हा परिषद यांच्याकडून कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.