Congress Political News : राहुल गांधी यांच्या दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रेचे आज महाराष्ट्रात आगमन होत आहे. नंदूरबार येथे राज्यातील सर्व काँग्रेस नेते त्यांच्या स्वागतासाठी जमा झाले आहेत. यानिमित्ताने महाविकास आघाडीच्या नेत्यांनादेखील राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
नाशिकमध्ये येत्या गुरुवारी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे आगमन होत आहे. या वेळी त्यांचा दुपारीच जुने नाशिक भागात सुमारे दोन तास रोड शो होईल. या 'रोड शो'मध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेसच्या congress पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांनी सहभागी व्हावे, असे प्रयत्न सुरू केले आहेत. आदित्य ठाकरे यांनी अद्याप या निमंत्रणाला होकार दिलेला नाही. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या loksabha Election 2024 पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि शिवसेना Shivsena एकत्र येऊन नाशिकमध्ये राहुल गांधी यांच्या 'रोड शो'च्या निमित्ताने मोठे शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.
या संदर्भात काल रात्री ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या नियोजनावर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गांभीर्याने काम करावे. या दौऱ्यात नागरिकांच्या सहभागासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विशेषतः महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन दौऱ्याचे नियोजन करावे, असे सांगण्यात आले.
भारत जोडो यात्रेत Bharat Jodo Nyay yatra सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी 25 हजार निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. युवक काँग्रेसच्या वतीने स्वतंत्रपणे नियोजन केले जात आहे. 50 हजार निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. या निमंत्रण पत्रिका शहरातील सामाजिक कार्यकर्ते नागरिक आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना व्यक्तीशः पोहोचविण्यात येणार आहेत. विशेषता 'रोड शो'मध्ये सहभागी होण्यासाठी जुने नाशिक भागातील सर्व सामाजिक आणि धार्मिक कार्यकर्त्यांनाही आवाहन करण्यात आले आहे. याबाबत पक्षाच्या सर्व आघाड्या आणि पदाधिकाऱ्यांनी काम सुरू केले आहे, असे प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस राहुल दिवे Rahul Dive यांनी सांगितले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.