Shivsena UBT Politics: राहुल गांधींच्या विरोधातील आक्षेपार्ह विधान ठाकरेंच्या कार्यकर्त्याच्या अंगलट येणार; काँग्रेसने गाठले पोलिस ठाणे!

Rahul Gandhi; Shiv Sena's Bala Darade's stunt will backfire, Congress is aggressive -शिवसेनेचे वादग्रस्त कार्यकर्ते बाळा दराडे यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना धमकी दिली होती.
Bala Darade & Rahul Gandhi
Bala Darade & Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi News: शिवसेनेचे सिडको येथील कार्यकर्ते बाळा दराडे हे विविध वादग्रस्त उपक्रमांमुळे चर्चेत असतात. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतेच असेच एक वादग्रस्त विधान करून चर्चेत येण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांचा हा प्रयत्न त्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत.

स्वा. सावरकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे बाळ दराडे यांनी वादग्रस्त विधान केले. काँग्रेस नेते राहुल गांधी हे स्वा. सावरकर यांना माफीवीर म्हणतात. हे सहन करणार नाही. महाविकास आघाडी असली तरी ती खड्ड्यात गेली. राहुल गांधी यांना काळे फासू असा इशारा त्यांनी दिला होता. राहुल गांधी यांचा ताफा अडवून त्यांच्यावर दगडफेक केली जाईल, अशी धमकीही त्यांनी दिली.

महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अशी विधाने केल्याने ते राज्यभर चर्चेचा विषय बनले होते. यासंदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी दराडे यांच्या विधानाशी फारकत घेतली आहे. दराडे यांचे ते विधान व्यक्तिगत असल्याचा दावा बडगुजर यांनी केला. त्यामुळे शिवसेना दराडे यांच्यापासून अलिप्त असल्याचे चित्र आहे.

Bala Darade & Rahul Gandhi
Girish Mahajan Politics: गिरीश महाजन यांचा स्वबळाचा नारा; वास्तव की सहकाऱ्यांना चकवा!

या विषयावर काँग्रेस पक्ष मात्र आक्रमक झाला आहे. श्री दराडे हे किरकोळ कार्यकर्ते असून स्टंट करणे ही त्यांची सवय आहे. आज पर्यंत विविध वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला आहे. बातमीचा विषय ठरवा म्हणून त्यांनी हे विधान केले असावे. त्यांची क्षमता गल्लीत निवडून येण्याची देखील नाही, अशी टीका स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

या विषयावर काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात आज सकाळी शहर अध्यक्ष आकाश छाजेड, विजय पाटील आणि अन्य पदाधिकारी अंबड पोलीस ठाण्यात जाऊन दराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणार आहेत. दराडे यांनी अत्यंत आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर वक्तव्य केले आहे.

हा प्रकार म्हणजे एक प्रकारे संवैधानिक आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता या पदावर कार्यरत राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा करणार असल्याची कबुलीच त्यांनी दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी कोणतीही वाट न बघता त्यांना तातडीने गुन्हेगारी कायद्याखाली अटक करावे अशी मागणी काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी केली आहे.

श्री दराडे हे सिडको भागातील एक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पत्नी किरण गामने (दराडे) या शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरसेविका आहेत. कदाचित राजकीय स्टंट म्हणून किंवा पक्षांतराचे वारे पाहता भाजपमध्ये जाण्यासाठी त्यांनी हे विधान केले असावे, असे बोलले जाते. श्री दराडे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा यापूर्वीही सुरू होत्या. मात्र आता त्यांनी थेट लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या विषयी वक्तव्य केल्याने ते अंगलट येण्याची चिन्हे आहेत.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com