Balasaheb Thorat On Election : निवडणूक आयुक्तांवर महाभियोग? राजकीय 'स्टाइल', प्रेसचा 'ड्राफ्ट', राहुल गांधींना नोटीस अन् थोरातांचा 'बोचरा' सल्ला !

Rahul Gandhi Vote Theft Allegations Balasaheb Thorat Advises Election Commissioner Gyanesh Kumar : राहुल गांधी यांनी केलेल्या मत चोरी आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेवर काँग्रेस बाळासाहेब थोरात यांनी मोठा सल्ला दिला आहे.
Balasaheb Thorat  On Election
Balasaheb Thorat On ElectionSarkarnama
Published on
Updated on

Vote theft allegations India : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मत चोरी आरोपावर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या आरोपांची चौकशी करण्याऐवजी निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे.

यावर अहिल्यानगरमधील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांची राजकीय शैली, त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील मुद्यांचा ड्राफ्ट आणि दिलेला बोचरा सल्ला चर्चेत आला आहे. तसंच मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग आणण्याच्या विरोधी इंडिया आघाडीने हालचाली सुरू केल्या आहेत, यावर देखील थोरातांनी प्रतिक्रिया दिली.

'इंडिया आघाडी'ने मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. यातच 'इंडिया आघाडी'ने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक (Election) लढण्याची देखील तयारी केली आहे. या राजकीय घडामोडींमुळे पुढील काळात दिल्लीतील राजकीय वातावरण अधिकच तापणार असल्याचे दिसते. मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवण्याच्या इंडिया आघाडीच्या हालचालींवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देत, केंद्रीय निवडणूक आयोगावर जोरदार प्रहार केला.

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, "निवडणूक आयोगाची प्रेस ऐकल्यावर मोठी गंमत वाटली. निवडणूक आयोगानं सत्ताधारी म्हणून राहाण्याची गरज नाही. परंतु मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्वतः एक पक्ष स्थापन करावा. सगळंच त्यांच्या हातात आहे. राजकीय नेत्यासारखं बोलत आहे. त्यांनी एकाही आरोपाला उत्तर दिलेलं नाही."

Balasaheb Thorat  On Election
Top 10 News : बेस्ट पतपेढीचा निकालाच्या आधीच ठाकरे ब्रॅंडचीच चर्चा, ‘मी त्या सभेचा साक्षीदार- शहाजीबाजू काय बोलले यासह पाहा राजकीय बातम्या...

थोरात यांनी, "निवडणूक आयोग एकतर्फा निर्णय घेत चालला आहे. यात 45 दिवसांत चित्रीकरण काढून टाकण्याचं ठरलं आहे. यावर दिलेलं गंमतीदार उत्तर समजलचं नाही डिजिटल स्वरुपातील यादी पोचली नाही, गठ्ठे पोचवले फक्त, याचं देखील उत्तर दिलेलं नाही. त्यांची अनेक उत्तर राजकीय भाष्य करणारी दिली. मला वाटतं त्यांचा 'ड्राफ्ट' तयार होता. हा त्यांचा ड्राफ्ट तयार करून कुठून तरी आला होता. त्यांनी फक्त वाचन केलं, असं मला वाटतं."

Balasaheb Thorat  On Election
Contractors Protest : किती थकबाकी? 90 हजार कोटी! 35 जिल्ह्यांमध्ये आक्रोश, उपासमारीत असलेल्या कंत्राटदारावर आत्महत्येची वेळ!

राहुल गांधी यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस काढून सात दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. त्यावर थोरात म्हणाले, 'त्या अल्टीमेटला अर्थ नाही. राजकीय टाइप केलेला, त्यांनी फक्त 'ड्राफ्ट' वाचून दाखवला. ते कुणाच्या तरी निर्देशप्रमाणे चालत आहेत. ते स्वायत्त म्हणून त्यांची वागणूक दिसत नाही. आम्हा सर्वांना आता शेषन यांची आठवण येते. स्वायतत्ता काय असते, निवडणूक कशी राबवावी, हे कायम त्यांचं उदाहरण राहणार आहे.'

इतिहास असे सांगतो की, स्वातंत्र्य लढ्यात संघानं भागच घेतलेला नाही. इंग्रजांशी मिळतं-जुळत होतं, हा सगळा इतिहास आहे. संघाच्या इमारतीवर तिरंगा सुद्धा फडकवला नाही, ही अवस्था होती. बदलत्या काळाबरोबर ते विषय फक्त राजकारणासाठी बोलतात, असे माझं मत थोरातांनी व्यक्त केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com