Contractors Protest : किती थकबाकी? 90 हजार कोटी! 35 जिल्ह्यांमध्ये आक्रोश, उपासमारीत असलेल्या कंत्राटदारावर आत्महत्येची वेळ!

Maharashtra Contractors Protest 90,000 Crore Pending Bills Builders & Engineers Associations : थकीत बिलांची देयके मिळावी यासाठी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, राज्य अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानं राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शनं केली.
Contractors Protest
Contractors ProtestSarkarnama
Published on
Updated on

Contractors federation Maharashtra : 90 हजार कोटींच्या थकीत बिलांसाठी राज्यातील कंत्राटदार आक्रमक झाला आहे. राज्य सरकारकडे थकीत बिलांची देयके मिळण्यासाठी अल्टीमेटम दिला आहे. यासाठी आज राज्यातील 35 जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटदारांनी निदर्शने केली.

आठ महिन्यांपासून थकीत बिलांची देयके मिळत नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. आर्थिक देणी वेळेवर जात नसल्याने कंत्राटदारांवर आत्महत्येची वेळ सरकारने आणली आहे. थकीत देयकांवर आठ दिवसांत तोडगा न निघाल्यास राज्यभातील कंत्राटदार मुंबईतील आझाद मैदानावर सराकरविरोधात आंदोलन उभारतील, असा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील (Maharashtra) जवळपास सार्वजनिक बांधकाम विभाग, जलजीवन मिशन ग्रामीण पाणीपुरवठा ग्रामविकास विभाग, जलसंपदा जलसंधारणासह अनेक विभागातील सरकारची विकासाची कामे कंत्राटदारांनी पूर्ण केली आहेत. परंतु गेल्या आठ महिन्यांपासून बिलाचा एक रुपयाही सरकारकडून मिळाला नाही.

राज्यातील अभियंता, ओपन कंत्राटदार, मजूर संस्था वाहतूकदार माल सप्लायर्स, हातावर पोट असणारे रोजंदारी कामगार, कायम नोकरीस असणारा शिक्षित वर्गासह जवळपास पाच ते सहा कोटी लोकांचा रोजगार आणि व्यवसाय देशोधडीला लागला आहे. या सर्वावर तातडीचा उपाय म्हणजे, थकीत बिलांची देयके मिळावी, यासाठी सरकारने (Government) मार्ग काढावा.

Contractors Protest
Sangrambapu Bhandare controversy : कीर्तनकाराचा 'नथूरामजी गोडसे' होण्याचा इशारा; इकडं भाजपच्या तिन्ही जिल्हाध्यक्षांची पोलिस अधीक्षकांकडे धाव!

थकीत बिलांची देयके मिळण्यासाठी आज राज्यभरातील 35 जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या नेतृत्वाखाली कंत्राटदारांनी आज धरणे आंदोलन केले.

Contractors Protest
Rahul Gandhi Hindutva controversy : राहुल गांधींचा हिंदुत्वाचा प्रचार रोखण्याचा आदेश; विरोधकांचा आरोप, थोरात म्हणाले, 'आम्ही पक्के हिंदू...'

राज्यातील सगळी विकासकामे ठप्प आहेत. कुठल्याही सरकारी लेखाशीर्षकावर कंत्राटदार यांचे देयके देण्यासाठी निधी उपलब्ध केला जात नाही. नवीन कोणतेही सरकारी विभागाकडे विकासात्मक कामे मंजूर केली जात नाही, सरकारने लाडका कंत्राटदार म्हणून केलेल्या कामांची देयके तातडीने द्यावी, अशी मागणी धरणे आंदोलन करताना कंत्राटदारांनी केली.

कंत्राटदारांची घडी विस्कटली

राज्य सरकारच्या विविध योजनातंर्गत कंत्राटदारांनी विकासाची कामे पूर्ण केली असून, आत्तापर्यंत जवळपास 90 हजार कोटीची बिले सरकारकडे प्रलंबित आहेत. सरकारकडून बिलांच्या निधीबाबत ठोस निर्णय होत नसल्यामुळे कंत्राटदार कर्जबाजारी झाले आहेत. कर्जांच्या हप्ते भरणे देखील शक्य होत नाही. कंत्राटदार, त्याचे कुटुंब आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न उभा राहिला असून, उपासमारीची वेळ आल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

मुंबईत आंदोलनाचा इशारा

कर्जबाजारीपणा कंटाळून राज्यात कंत्राटदार आत्महत्येसारखे प्रकारकडे जात आहे. सरकारने कंत्राटदारांच्या थकीत बिलांची देयके देण्यासाठी गांभीर्याने कार्यवाही न केल्यास पुढील आठ दिवसानंतर रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करूच, पण मुंबईतील आझाद मैदानावर राज्यभरातील कंत्राटदार सरकारविरोधात आंदोलन पुकारतील, असा इशारा कंत्राटदारांच्या संघटनांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com