Rahuri Assembly Constituency Election : राहुरी विधानसभेसाठी निवडणूक आयोगाची लगबग; शिवाजी कर्डिलेंच्या जागी कोण? अक्षयला संधी की, सुजयला? तनपुरेंच्या भूमिककडे लक्ष?

Rahuri By-Election: Voter List Revision After Shivaji Kardile Death : भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर.
Rahuri Assembly Constituency Election 1
Rahuri Assembly Constituency Election 1Sarkarnama
Published on
Updated on

Rahuri by-election update : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदर शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर भारत निडवणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आयोगाने राहुरी विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.

परंतु निवडणुकीच्या रिंगणात कोण असणार? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे काय भूमिका घेणार? शिवाजी कर्डिले यांच्या जागेवर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना संधी मिळणार की, भाजप घराणेशाही टाळून अन्य कोणाला संधी देणार, याचे खल सुरू झाले आहे. यासाठी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे पाटलांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. याशिवाय महाविकास आघाडी कोणता निर्णय घेत, याकडे देखील लक्ष असणार आहे.

भाजप आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांचे 17 ऑक्टोबरला निधन झाले. तेव्हापासून राहुरी विधानसभेची जागा रिक्त आहे. यावर आता निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. यानंतर लगेचच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याने उमेदवार कोण असणार, याच्या चर्चेने ऐन थंडीत राजकीय वातावरण तापलं आहे.

शिवाजी कर्डिले यांच्या आकस्मित निधनानंतर राहुरीसह अहिल्यानगर जिल्ह्यात सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती. त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांच्या मागे उभं राहण्याचं भाजप (BJP) कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांच्यासह भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीरपणे बोलून दाखवलं होतं. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते नेमका कोणता निर्णय घेतात, याकडे आता लक्ष असणार आहे.

Rahuri Assembly Constituency Election 1
Balasaheb Thorat Vs Rohit Pawar : राहुल गांधी ताकदीने लढतात, पण गल्लीत काय? काँग्रेसचा भाजपच्या हातात हात; पवारांनी फोटोच आणले समोर...

राहुरी विधानसभा निवडणूक 2024 मध्ये शिवाजी कर्डिले आणि प्राजक्त तनपुरे यांच्यात लढत झाली होती. यात शिवाजी कर्डिलेंनी विजय मिळवला होता. पण आता कर्डिले यांच्या निधनानंतर प्राजक्त तनपुरे सहानुभूतीच्या लाटेविरोधात पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? नेमकी ते कोणती भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीचे नेते, विशेष करून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष असणार आहे.

Rahuri Assembly Constituency Election 1
Sangamner taluka railway issue : नाशिक-पुणे रेल्वे मार्गाबाबत, मंत्री विखेंनी दिला शब्द! पण संगमनेरचा उल्लेख टाळला?

तनपुरे कोणता निर्णय घेणार

प्राजक्त तनपुरे भाजपच्या संपर्कात असल्याच वावड्या उठत आहेत. पण तनपुरेंनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याशिवाय तनपुरे कारखाना निवडणुकीच्या काळात अजित पवार पवार यांनी राहुरीतील तनपुरे वाड्यावर जात कुटुंबियांबरोबर जेवण केलं. त्यामुळे प्राजक्त तनपुरेंची भूमिकेविषयी उत्सुकता आहे.

अक्षय कर्डिलेंचा विचार होणार का?

शिवाजी कर्डिले यांच्यानंतर अक्षय कर्डिले यांना संधी देण्याची चर्चा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. पण, अक्षय कर्डिले यांचे वय पाहता, त्यांना पुन्हा संधी मिळू शकते, असे देखील भाजपमध्ये दुसऱ्या फळीमध्ये चर्चा आहे. अक्षय कर्डिलेंभोवती ही चर्चा सुरू असतानाच, माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे देखील नाव राहुरी विधानसभा निवडणुकीत चर्चेत आहे.

सुजय विखेंच्या नावाची चर्चा

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुजय विखे पाटलांनी मला रिकामं बसवू नका, असं म्हणत जिल्ह्यातील भाजप नेत्यांमागे राजकीय पुर्नवसनासाठी तगादा लावला आहे. दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर ही जबाबदारी होती. पण कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर सुजय विखे पाटलांना संधी मिळते का? या प्रश्नाची जोरदार चर्चा आहे.

3 जानेवारीला एकात्मिक प्रारूप मतदार यादी

राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 1 जानेवारी 2026 या अर्हता दिनांकाच्या आधारे राबविण्यात येणार आहे. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण 29 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर 3 जानेवारीला एकात्मिक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 3 ते 24 जानेवारी दरम्यान ठेवण्यात आला आहे.

अंतिम यादी 14 फेब्रुवारीला

प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा 7 फेब्रुवारीपर्यंत करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी 14 फेब्रुवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा लाभ घेऊन पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे तसेच आवश्यक त्या दुरुस्त्या करून घ्याव्यात, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com