Shivaji Kardile On Sujay Vikhe : 'सुजय विखे राज्यात नको, आमचं मंत्रिपद धोक्यात येईल'; आमदार कर्डिले मनातलं बोलून बसले!

Rahuri BJP MLA Shivaji Kardile former MP Sujay Vikhe political rehabilitation Ahilyanagar : भाजप माजी खासदार सुजय विखे यांच्या राजकीय पुनर्वसनावर राहुरीचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनी मार्मिक टिप्पणी केली आहे.
Shivaji Kardile On Sujay Vikhe
Shivaji Kardile On Sujay VikheSarkarnama
Published on
Updated on

BJP Maharashtra Politics : भाजपचे अहिल्यानगरमधील माजी खासदार सुजय विखे यांच्या राजकीय पुनर्वसनावरून आमदार तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी मोठी टिप्पणी केली.

सुजय विखे स्वतःच्या राजकीय पुनर्वसनासाठी धडपडत आहेत. यातच त्यांनी राज्यातील राजकारणातील एन्ट्री केल्यास ती 'पाॅवरफूल' ठरू शकते. आमदार कर्डिले यांनी यावर भाष्य करताना, आपलं मंत्रिपद धोक्यात येईल, असं बोलून गेले आहेत. आमदार कर्डिलेंची ही मिश्किल टिप्पणी असली, तरी पोटातलं ओठावर आल्यानं पुढं अडचणीचं ठरू नये, अशी चर्चा आता रंगली आहे.

भाजप (BJP) आमदार शिवाजी कर्डिले यांच्या उपस्थितीत अकोळनेर (ता. नगर) इथं धर्मबीज सोहळा झाला. माजी खासदार सुजय विखे देखील यावेळी उपस्थित होते. सुजय विखेंनी व्यासपीठावर दोन आजी आमदार आहेत. पण मी माजी खासदार आहे. मी फक्त बोलण्याचं काम करू शकतो, असे विधान केलं.

Shivaji Kardile On Sujay Vikhe
Indian population survey : 'जनगणना' अन् 'जात गणना' किती महत्त्वाची! मल्लिकार्जुन खरगेंनी मांडले मुद्दे...

आमदार कर्डिले यांनी यानंतर केलेल्या भाषणात माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्या राजकीय पुनर्वसनाच्या मुद्यावर टिप्पणी केली. सुजय विखे यांना आम्ही लवकर आजी करणार आहोत. त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवणार आहोत. केंद्रात पाठवल्यानंतर त्यांनी राज्यात येऊ नये, अशी आमची इच्छा आहे. राज्यात आल्यावर आमचे मंत्रीपद अडचणीत येईल, असे कर्डिले यांनी म्हटले.

Shivaji Kardile On Sujay Vikhe
Sangamner Sugar Factory Election : शिंदेंचा शिलेदार पुन्हा थोरातांना भिडणार; मंत्री विखे रणनीती आखणार?

'आमच्या मंत्रीपदाला अडचणीचे ठरू नये, यासाठी सुजय विखेंचे पुनर्वसन राज्यातील राजकारणापेक्षा केंद्रात करणार आहोत. राज्यातील राजकारणापेक्षा केंद्रातील राजकारणात सुजय विखेंसाठी चांगले आहे', अशी मिश्किल टिप्पणी देखील आमदार कर्डिले यांनी केली.

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेतर्फे महायुतीच्या आमदारांचा नुकताच सत्कार झाला. सुजय विखे यांनी या कार्यक्रमात स्वतःच्या राजकीय पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित केला. मला फक्त भाषणापुरते ठेवू नका, माझे कुठेतरी राजकीय पुनर्वसन करा, असे त्यांनी जाहीर कार्यक्रमात म्हटले होते.

विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी यावेळी सुजय विखेंना श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिला होता. तर आमदार कर्डिले यांनी सुजय आमच्यासाठी खासदारच आहे, असे म्हटले होते. आता आमदार शिवाजी कर्डिले यांनी पुन्हा एकदा सुजय विखे यांना केंद्रात पाठवण्याचे विधान केल्याने, विखेंना राज्यसभेवर संधी मिळणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com