Sujay Vikhe : सुजय विखे म्हणतात, "स्पर्धेत नाही, पण सर्व्हे केल्यास माझंच नाव पुढे दिसेल" : राहुरी पोटनिवडणुकीत सर्व्हे पॅटर्ननं वाढवली रंगत

Political stance of BJP leader Sujay Vikhe and former minister Prajakt Tanpure is likely to play a crucial role in shaping Akshay Kardile political future in the Rahuri by-election : राहुरी पोट निवडणुकीत सुजय विखे पाटील हे सर्वेक्षणात आपल्याचा नावाला प्रथम क्रमांकाची पसंती असल्याचे सांगून पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधून घेत आहेत.
Sujay Vikhe Rahuri politics
Sujay Vikhe Rahuri politicsSarkarnama
Published on
Updated on

Rahuri by election : राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता आहे. भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांनी जोरदार तयारी केली असली तरी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजय विखे पाटील यांची भूमिकेने उत्सुकता वाढवली आहे.

सर्वेक्षणात आपल्यालाच पहिल्या क्रमांकाची पसंती मिळत असल्याचा विखे पाटील वारंवार उच्चार करत आहे. त्यामुळे राहुरीच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या भूमिकेविषयी कार्यकर्ते संभ्रमात दिसत असले तरी त्यांच्या भूमिकेने उत्सुकता वाढवली आहे.

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देखील भगवे वस्त्र धारण केलेत. ते भाजपसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे विखे पाटील अन् तनपुरे यांची राजकीय भूमिका अक्षय कर्डिले यांचे राजकीय भवितव्य ठरवणार हे मात्र निश्चित!

राहुरी पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होत आहे. पोटनिवडणूक कधी होईल, याची भविष्यवाणी सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी केली होती. त्याचवेळी सर्व्हेत पहिल्या क्रमांकाची पसंती आपल्याच असेल, असा दावा केला. या सर्व्हेबाबत एकदा नाही तर, विखे पाटील वारंवार दावा करत आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी उत्सुकता आहे. असे असले तरी विखे पाटील आपण स्पर्धेत नसल्याचे सांगत अक्षय कर्डिलेंच्या उमेदवारीसाठी आग्रही भूमिका मांडताना दिसत आहेत.

भाजपचे (BJP) दिवंगत नेते दिलीप गांधी हे 2019 मध्ये विद्यमान खासदार होते. त्यावेळी सुजय विखे पाटील भाजपकडे राज्य पातळीवर फिल्डिंग लावून होते. सर्वेत सुजय विखे पाटील यांचेच नाव पुढे येत होते. त्यावेळी नेते देवेंद्र फडणवीस हे कसं काय? त्यावेळी विखे पाटलांनी मतदारसंघात जोरदार तयारी सुरू असल्याचं सांगून बाजी मारली.

Sujay Vikhe Rahuri politics
Akshay Kardile And Prajakt Tanpure : अक्षय कर्डिलेंची उमेदवारी फायनल? प्राजक्त तनपुरेंचं कधी ठरणार?

सुजय विखे पाटील 2024च्या लोकसभेत पराभूत झाले. त्यावेळी देखील सर्वे झाले होते. तरी देखील पदरी पराभव आला. या पराभवातून सावरत सुजय विखे पाटील मतदारसंघात प्रचंड सक्रिय आहेत. यातूनच राहुरी विधानसभा मतदारसंघातील सर्व्हेत, आपल्याला पहिल्या क्रमांकाची पसंती असल्याचा सुजय विखे पाटील वारंवार दावा करत आहेत.

Sujay Vikhe Rahuri politics
Rahuri Byelection : प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशाला विखे पाटलांचा विरोध : जयंत पाटील भाच्यासाठी CM फडणवीसांकडून लावणार फिल्डिंग?

सर्व्हे पॅटर्न चर्चेत

या सर्व्हेनुसार पहिल्यास, भाजप कोणता निर्णय घेते याची उत्सुकता वाढली आहे. सर्व्हेत जो पुढे आहे तो विधानसभेला आणि जो शिल्लक राहील तो विधानपरिषदेला असे भाजपचे गणित आहे. खासदारकीचा सर्व्हे पॅटर्न राहुरी पोट निवडणुकीत पुन्हा 'रिपीट' होताना दिसतो आहे. त्यामुळे भाजपकडून राहुरी पोटनिवडणुकीत कोणाला विधानसभेला तिकीट मिळते, याची उत्सुकता आहे.

तनपुरे-कर्डिले राजकीय संघर्ष

राहुरी विधानसभा मतदारसंघात पारंपारिक पद्धतीने कर्डिले-तनपुरे यांच्यात राजकीय लढती झाल्या आहेत. 2019च्या लढतीत, प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजी कर्डिले यांचा पराभव केला होता. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तनपुरे यांना मंत्रीपद देखील मिळालं होतं. शिवाजी कर्डिले यांनी या पराभवाचा वचपा 2024च्या निवडणुकी घेतला.

कर्डिलेंपेक्षा विखे तनपुरेंविरोधात आक्रमक

शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे मतदारसंघात पोट निवडणूक होत आहे. माजी मंत्री तनपुरे यांनी भगवे उपरणे परिधान करत मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अक्षय कर्डिलेंपेक्षा विखे पाटील यावरून तनपुरेंना डिवचत आहेत. तनपुरेंनी विखे पाटील यांच्या जरतरच्या विधानांकडे दुर्लक्ष करत, भगव्यावर शिक्का त्यांचाच शिक्का नाही, हा वारकरी संप्रदाय व भागवत धर्माला अनुसरून आहे, असे तनपुरेंनी सूचक सुनावलं आहे.

पवारांचा मी निष्ठावान; तनपुरे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता असल्याचा उच्चार तनपुरेंनी करत, मतदारसंघात पोट निवडणुकीच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत दिले. तनपुरे कुटुंब आणि मतदारसंघातील कार्यकर्ते, मतदार यांच्याशी तीन पिढ्यांची नाळ असल्याचाही उच्चार प्राजक्त तनपुरे यांनी केला. एकप्रकारे विखे पाटील आणि तनपुरे यांची भूमिका अक्षय कर्डिले यांचे राजकीय भवितव्य ठरवणार असंच दिसतं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com