Raksha Khadse: केळी उत्पादकांना रेल्वे प्रशासनाने भरपाई द्यावी

खासदार रक्षा खडसे यांनी सावदा रेल्वे स्थानकावर केळी वाहतूक रखडल्याने रेल्वे अधिकाऱ्यांना सुनावले
MP Raksha Khadse
MP Raksha KhadseSarkarnama
Published on
Updated on

सावदा : रेल्वेतर्फे (Railway) सावदा (Savda) रेल्वेस्थानकावर बीसीएन वॅगन वेळेवर न दिल्याने केळी वेळेत दिल्ली (Delhi) येथे पोहचली नाही. ती जर खराब झाली आणि त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर रेल्वेने नुकसान भरून द्यावे. या पुढे गैरसोय झाल्यास केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यासोबत बैठक घ्यावी लागेल, अशा शब्दांत खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सुनावले. (Banana growers facing issues for banana railway transport)

MP Raksha Khadse
Pankja Munde: पंकजाताई म्हणतात, मला तो `सुखद` अनुभव आलेला नाही!

नवी दिल्लीसाठी केळी पाठविण्यासाठी बीसीएन वॅगन उशिरा लोडिंग होऊन तब्बल १४ तासानंतर शुक्रवारी (ता २) दुपारी दोनला रवाना झाली. यामुळे केळी उशिरा पोहचून खराब होऊ शकते. अशी परिस्थिती अलीकडे वारंवार होत असल्याने बाब केळी उत्पादक शेतकऱ्यांनी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे मांडली. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भुसावळ डीआरएम कार्यालयात ही बैठक पार पडली.

MP Raksha Khadse
Congress: भाजपमुळे गरिबांचे जगणे हराम झाले!

या वेळी बोलताना खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वे अधिकारी राजेश कुलहरी (प्रभारी डीआरएम), नवीन पाटील (एडीआरएम),शिवराज मानसपुरे (सिनिअर डीसीएम), आर. के. शर्मा (एससी डीओएम), मयूर वाघुळदे (एएमई) या अधिकारी वर्गाशी चर्चा केली. केळी उत्पादक शेतकरी यांना वेळेत बीसीएन वॅगन उपलब्ध करून ती वेळेत रवाना करावी, असे खडसे यांनी सांगितले.

अखेर यावर उपाय म्हणून रेल्वेचे अधिकारी योगेश पाटील यांची विशेष नियुक्ती करण्यात आली. ते आणि केळी उत्पादक शेतकरी हे एकमेकांच्या संपर्कात राहून बीसीएनची नोंदणी, वेळापत्रक आणि गाडी रवाना होईपर्यंतची काळजी घेतील, असे ठरले. यावेळी सावदा रेल्वेस्टेशन फळबागायतदार युनियनचे अध्यक्ष डी. के. महाजन वसंत महाजन, नरेश सदेजा, संतोष पाटील, नंदकिशोर महाजन आदी उपस्थित होते. या वेळी त्यांनी रेल्वे अधिकारी यांच्यासमोर आपली कैफियत मांडली.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com