Congress: भाजपमुळे गरिबांचे जगणे हराम झाले!

कापडणे येथे काँग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रेनिमित्त दिवंगत स्वातंत्र्य सैनिकाच्या वीर पत्नीचा बाळासाहेब थोरात. यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
Balasaheb Thorat with congress leaders.
Balasaheb Thorat with congress leaders.Sarkarnama
Published on
Updated on

कापडणे : भाजपने (BJP) भूलथापा देत देशात सत्ता हस्तगत केली. इंधनासह धान्य, दूध, पीठावर कर लादला. (GST) महागाईचा आगडोंब उसळला. गरिबांसह सर्वसामान्यांचे जगणे हराम केले आहे. देशांतर्गत अशांतता पसरवीत ईडी, (ED) सीबीआयसारख्या (CBI) यंत्रणांच्या गैरवापरातून लोकशाही धोक्यात आणली जात आहे. त्यामुळे भाजपच्या तावडीतून लोकशाही वाचविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सर्वांनी संघटीतपणे मुकाबल्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले. (BJP missusing centre agencies for harrase opposition)

Balasaheb Thorat with congress leaders.
Congress: विधानपरिषदेचे विरोध पक्षनेतेपद न मिळाल्याने कॉंग्रेसची नाराजी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काँग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रेला कापडणे (ता. धुळे) येथून श्री. थोरात यांच्या हस्ते बुधवारी सुरवात झाली. प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर, आमदार सुधीर तांबे, सहप्रभारी प्रदीप राव, प्रदेश उपाध्यक्ष भा. ई. नगराळे उपस्थित होते.

Balasaheb Thorat with congress leaders.
Dhule News: धुळे जिल्ह्यातून जयकुमार रावल,अमरिशभाई पटेल यांची संधी हुकली!

श्री. थोरात म्हणाले, स्वातंत्र्याचा इतिहास कापडण्याचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. धोक्यातील देश वाचविण्यासाठी राहुल गांधी लढत आहेत. तोच स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा आमदार कुणाल पाटील समर्थपणे चालवीत आहेत. आमदार पाटील म्हणाले, कापडणे स्वातंत्र्य लढ्यातील खानदेशचे केंद्र ठरले. येणाऱ्या पिढीला स्वातंत्र्याची प्रेरणा मिळावी म्हणून काँग्रेसने ही पदयात्रा काढली आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानापुढे नतमस्तक होण्याची वेळ आली आहे. प्रा. विलास चव्हाण, कवी प्रभाकर शेळके, कापडणेचे माजी सरपंच प्रमोद पाटील यांनी स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास मांडला.

भरपावसात लक्षवेधी पदयात्रा

आझादी गौरव पदयात्रेचा देवभाने, सरवडमार्गे सोनगीर येथे शहीद नीलेश महाजन यांच्या स्मारकाला अभिवादनानंतर समारोप झाला. मुसळधार पावसातही आमदार कुणाल पाटील यांनी तासाभरात पदयात्रा पूर्ण केली. पदयात्रेत सर्वांनी परिधान केलेली गांधी टोपी लक्षवेधी ठरली. कापडणे येथे आजी- माजी स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबाचा नेते थोरात यांच्या हस्ते सन्मान झाला.

यावेळी माजी आमदार डी. एस. अहिरे, प्रदेश सचिव युवराज करनकाळ, अश्विनी पाटील, डॉ. ममता पाटील, महिला जिल्हाध्यक्षा गायत्री जयस्वाल, संगीता पाटील, अर्चना पाटील, तालुकाध्यक्ष भगवान पाटील, सचिव डॉ. दरबारसिंग गिरासे, भगवान गर्दे, लहू पाटील, बाजीराव पाटील, अशोक सुडके, डॉ. एस. टी. पाटील, विमल बेडसे, सरपंच सोनीबाई भिल, भटू पाटील, प्रमोद पाटील, अंजन पाटील, डॉ. अनिल भामरे, मुजफ्फर हुसेन, सुरेखा बडगुजर, अविनाश महाजन, देवभाने सरपंच संजय देसले, केदारेश्वर मोरे, प्रमोद धनगर, गणेश गर्दे, हर्षल साळुंखे आदी उपस्थित होते.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com