Raj Thackeray At Kalaram Mandir : राज ठाकरेंच्या उपस्थितीत अमित ठाकरे यांनी काय केला संकल्प?

Raj Thackeray Politics : अमित ठाकरे यांनी आज काळाराम मंदिरात केला सपत्नीक अभिषेक!
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nashik MNS News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी श्री काळाराम मंदिरात दर्शन घेतले. या वेळी त्यांनी विविध साधू संतांशीदेखील चर्चा केली.

मनसे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांनी आज अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे यांच्यासह काळाराम मंदिरात भेट दिली. या वेळी अमित ठाकरे यांनी सपत्नीक अभिषेक केला. काळाराम मंदिरातील त्यांचे स्वागत केले. माजी महापौर अशोक मुद्रक Ashok Mudrak आणि शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांचा विविध पदाधिकारी त्यांच्यासोबत होते. ठाकरे मंदिरात आल्याने त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीतच ठाकरे यांनी विविध पंथांच्या साधूंची ही भेट घेतली. याविषयी ठाकरे यांनी कोणतेही राजकीय विधान केले नाही. त्यामुळे अमित ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत काळाराम मंदिरात kalaram Mandir केलेल्या अभिषेकप्रसंगी काय संकल्प केला, याची उत्सुकता कायम राहिली आहे.

Raj Thackeray
Mangesh Chavan : मंगेश चव्हाण यांनी गिरीश महाजनांच्या उपस्थितीत भर कार्यक्रमातच केली 'ही' घोषणा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) अठरावा वर्धापन दिन उद्या साजरा होत आहे. यानिमित्त शहरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात कार्यकर्त्यांचा मेळावा होईल. राज ठाकरे आगामी लोकसभा निवडणुकीबाबत काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघ Loksabha constituency बाबत तीन निरीक्षकांच्या पथकांकडून चाचणी केली आहे. मनसेची राजकीय भूमिका निवडणुकीत काय असेल, याबाबत विविध मतप्रवाह आहेत.

मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी राज ठाकरे Raj Thackeray यांची भेट घेतली होती. राज ठाकरे यांनीदेखील भाजपच्या काही नेत्यांची भेट घेतली होती. त्यामुळे मनसे महायुतीशी हात मिळवणी करेल काय याचे उत्तर उद्याच्या वर्धापन दिनातून मिळण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांनी नुकतीच पुणे Pune येथील मनसेच्या शहर कार्यालयाला भेट दिली होती. या वेळी कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि तयारी यावर नाराज होते. नाराजी मुळे ते निघून गेले होते. हा प्रसंग ताजा असल्याने नाशिक Nashik Politics शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून ठाकरे यांच्या आजच्या दौऱ्या संदर्भात तयारीत व्यस्त होते. सबंध शहरभर फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत. शहराच्या सर्व भागांच्या रस्ते आणि चौकात मनसेचे झेंडे MNS Flag लावण्यात आल्यामुळे शहरात सध्या तरी मनसेमय वातावरण दिसून येते. या सर्व पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मनसेचा वर्धापन दिन नाशिक शहरात साजरा होत आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या दौऱ्यात मुंबई Mumbai पुणे पाठोपाठ नाशिकला राजकीयदृष्ट्या महत्त्व दिल्याचे दिसून येते. त्यामुळेच आज अमित ठाकरे यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेऊन अभिषेक केल्यावर काय संकल्प केला याची उत्सुकता वाढली आहे.

Edited By : Rashmi Mane

R

Raj Thackeray
Jayashree Thorat News: बाळासाहेबांनी मुख्यमंत्री व्हावे, जयश्री थोरात यांनी दाखवली राजकीय चुणूक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com