Raj Thackeray Nashik Visit : मनसेचं नाशिक मनपा मिशन, राज ठाकरे दोन दिवस ठोकणार मुक्काम

MNS Strategy for Nashik Municipal Corporation Elections 2025 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर येत असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
Raj Thackeray Nashik Visit
Raj Thackeray Nashik VisitSarkarnama
Published on
Updated on

Nashik MNS : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घ्या असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर सर्वच पक्षांनी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. नाशिकमध्येही मनसेने तयारी सुरु केली आहे. नाशिक महानगपालिका निवडणूक हे मनसेचे महत्वाचे मिशन असणार आहे. त्यादृष्टीने राज ठाकरे स्वत: नाशिकच्या मैदानात उतरणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर येत असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. १५ व १६ मे असे दोन दिवस ते नाशिकमध्ये मुक्काम ठोकणार आहे. यात नाशिक मनपा निवडणुकीची रणनिती आखण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray Nashik Visit
Jalgaon Politics : भाजप-शिंदे गटाचं टेन्शन वाढलं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास होणार डोईजड

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र आल्यास त्याचा नाशिक महापालिका निवडणुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो. उद्धव ठाकरे यांच्याकडे आजूनही नाशिकमध्ये काही प्रमाणात संघटना अस्तित्वात आहे, अशात मनसे सोबत आल्यास महायुतीला ते आव्हान देऊ शकतात.

उद्धव ठाकरे हे यापूर्वीच कामाला लागले आहे. नाशिकमध्ये त्यांच्या पक्षाचे मोठे शिबीरही नुकतेच पार पडले. त्यात त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दोऱ्यावर येत आहेत. त्यामुळे या दौऱ्यात स्थानिक पातळीवर मनसे व उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या युतीसंदर्भात देखील आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.

एकेकाळी नाशिक मनसेचा बालेकिल्ला राहिला आहे. नाशिककरांनी तीन आमदार आणि महापालिकेतील सत्ता मनसेकडे सोपवली होती. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शहरातून तीन आमदार मनसेचे निवडून आले. त्यानंतर २०१२ मध्ये महापालिकेत मनसेची सत्ता आली. परंतु २०१७ च्या निवडणुकीत मनसेला अपेक्षित यश मिळाले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही मनसेला यश मिळाले नाही.

Raj Thackeray Nashik Visit
Narhari Zirwal Politics: मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रकृती अस्वस्थ, मुंबईच्या रुग्णालयात दाखल!

मात्र असे असतानाही नाशिकमध्ये मनसेचे पदाधिकारी सक्रीय आहेत. प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, उपाध्यक्ष सलीम शेख, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी विविध आंदोलने करून पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे. मनसेच्या नेत्यांनीही ठाकरे बंधूच्या एकत्रीकरणाचे स्वागत केले आहे. तसेच दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र यावेत, अशी कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे. विशेष म्हणजे दोन्ही बंधूनी एकत्र यावे, यासाठी नाशिकमध्ये बॅनरबाजीही झाली आहे. त्यामुळे दौऱ्यात यासंदर्भात राज ठाकरे काही भूमिका घेतात का हे पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com