Raj Thackrey Politics: विधानसभेच्या अपयशानंतर महापालिकेसाठी `मनसे`ची राज ठाकरेंवर भिस्त!

Raj Thackrey; MNS of Nashik demands voting on ballot paper, oppose EVM-आगामी महापालिका निवडणुकीत सामाजिक समतोल विचारात घेऊन पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याची मागणी
Raj Thackrey & MNS Meeting
Raj Thackrey & MNS MeetingSarkarnama
Published on
Updated on

Assembly election News: विधानसभा निवडणुकीत मनसेला नाशिकमध्ये जबर फटका बसला. मात्र आता मनसे महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. आत्तापासूनच उमेदवारीसाठी चाचपणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांना सर्वाधिकार देण्यात आले.

शहरात शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची पक्षाच्या कार्यालयात बैठक झाली. विधानसभा निवडणुकीत अनेक महत्त्वाचे शिलेदार आणि नेत्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर भारतीय जनता पक्षातून मनसेत दाखल झालेल्या दिनकर पाटील यांची या बैठकीला उपस्थिती होती.

Raj Thackrey & MNS Meeting
Election Commission : EVM हॅक होऊ शकतच नाही कारण...; विरोधकांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं मोठं स्पष्टीकरण

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या देवळाली, नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम या तिन्ही उमेदवारांना फटका बसला. मध्य मतदारसंघातून उमेदवाराने माघार घेतली. त्यानंतर झालेल्या या बैठकीत मतपत्रिकेवर मतदान घेण्यात यावे. `ईव्हीएम` वर आपला विश्वास राहिलेला नाही. `ईव्हीएम` ने निवडणुका घेऊ नये, असा ठराव करण्यात आला.

Raj Thackrey & MNS Meeting
Raj Kundra Summoned By ED: राज कुंद्रा याच्या अडचणीत वाढ; EDकडून फास आवळण्यास सुरवात

विधानसभेचा अनुभव गाठीशी असल्याने त्यापासून आगामी महापालिका निवडणुकांसाठी बोध घेतला पाहिजे. अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी प्रशासकीय यंत्रणा आणि सत्ताधारी पक्षाने गैरप्रकार केल्याची तक्रार केली. त्यामुळे आता अधिक सावध होऊन महापालिका निवडणुकीची तयारी केली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवार देताना सक्रिय कार्यकर्त्यांना स्थान द्यावे. सामाजिक संदर्भ विचारात घेऊन आणि प्रत्येक प्रभागाचा अभ्यास करून उमेदवार ठरविले जावे. त्यासाठी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी दिलेल्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, प्रदेश उपाध्यक्ष अॅड रतनकुमार इचम, दिनकर पाटील, जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आदींनी यावेळी कार्यकर्त्यांना विविध सूचना केल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २०१२ मध्ये महापालिकेवर एक हाती सत्ता मिळवली होती.

शहराच्या मूलभूत प्रश्नांना मनसेने हात घातला. अनेक लोकोपयोगी कामे केली. शहराच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले. `सीएसआर`निधीतून अनेक शहर विकासाचे प्रकल्प उभे करण्यात आले. या सर्व प्रकल्पांची वाताहात सध्याच्या भाजपच्या सत्ता काळात झाली आहे, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

नागरिकांनी मनसे आणि अन्य पक्षातील फरक लक्षात घेऊन पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवावा, असे आवाहन यावेळी सलीम शेख यांनी केले. एकंदरीतच विधानसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर मनसे पुन्हा एकदा जोमाने उभे राहण्याचा प्रयत्न करीत असल्याचे या बैठकीतून दिसले. अनेक महत्त्वाचे पदाधिकारी निवडणूक काळात पक्षाला सोडून गेले. मात्र काल झालेल्या बैठकीला नव्या कार्यकर्त्यांची आणि युवकांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यामुळे मनसे आता महापालिकेच्या तयारीला लागल्याचे चित्र दिसले.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com