Raj Kundra Summoned By ED: राज कुंद्रा याच्या अडचणीत वाढ; EDकडून फास आवळण्यास सुरवात

Shilpa Shetty Husband Raj Kundra Pornography Money Laundering Case Summoned by ED : राज कुंद्रा यांच्यावर आरोप असलेले पोर्नोग्राफी प्रकरण हे दोन वर्षांपूर्वीचे आहे. 2022 मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज कुंद्रासह काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Shilpa Shetty, Raj Kundra
Shilpa Shetty, Raj Kundra Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि त्यांचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दोन दिवसापूर्वी मुंबईत त्यांच्या घरी, कार्यालयावर ईडीने छापामारे केली होती, आता पोर्नोग्राफी प्रकरणात छापेमारीनंतर राज कुंद्रा यांना ईडीने समन्स बजावले आहे. सोमवारी ईडी कार्यालयात त्यांनी चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.

दोन दिवसापूर्वीच राज कुंद्रा यांच्याशी सबंधित अनेक ठिकाणी ईडीकडून छापे टाकण्यात आले होते. पोर्नोग्राफी प्रकरणात संबधीत अनेकांना ईडीने नोटीस बजावली आहे. यात सोमवारी राज कुंद्रा यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात जावे लागणार आहे.

शनिवारी राज कुंद्रा यांना ईडीने पोर्नोग्राफी संबधीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समन्स बजावले होते. यापूर्वी उत्तर प्रदेशातील काही शहरात 15 ठिकाणी याप्रकरणी छापेमारी केली होती, यात राज कुंद्रा यांचा देखील समावेश होता.

राज कुंद्रा यांच्यावर आरोप असलेले पोर्नोग्राफी प्रकरण हे दोन वर्षांपूर्वीचे आहे. 2022 मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज कुंद्रासह काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2024 च्या सुरवातीलाच शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर ईडीने छापेमारी केली होती, यात क्रिप्टो करंसी प्रकरणी 98 कोटी रुपये संपत्ती जप्त केली होती. पण मुंबई उच्च न्यायालयातील त्यांनी धाव घेतल्यानंतर त्यांना या प्रकरणात दिलासा मिळाला होता.

राज कुंद्रा याच्या विरोधात पोर्नोग्राफीबाबत अनेक गंभीर आरोप लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे यापूर्वी तो जेलवारी देखील करुन आला आहे. राज याने आपल्या आरोपाबाबत समाज माध्यमांवर मोठी पोस्ट केली होती. हे न्यायप्रविष्ठ प्रकरण असून मी न्यायालयाने सांगितलेल्या नियमाचे पालन करीत आहे. पत्नी शिल्पा शेट्टी हीचे नाव याप्रकरणात जोडले जात आहे. शेवटी न्यायाचाच विजय होतो, असे राज कुंद्रा याने म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com