Raj Thackeray Politics: मनसेने कंबर कसली, नाशिक शहरात भाजपला देणार कडवे आव्हान!

MNS Prepares to Challenge BJP in Nashik: दोन वेळा महापौर असलेल्या भाजपने पाच वर्षात केले काय?, मनसेच्या दिनकर पाटील यांचा प्रश्न.
Raj Thackeray & Dinkar Patil
Raj Thackeray & Dinkar PatilSarkarnama
Published on
Updated on

Dinkar Patil News: महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहरात पक्ष विस्तारासाठी जोमाने कामाला लागली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत सर्व ३१ प्रभागात उमेदवार देणार असल्याची घोषणा पक्षाचे सरचिटणीस दिनकर पाटील यांनी केली. त्यामुळे मनसे भाजपला मोठे आव्हान देणार का? अशी स्थिती आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत गुढीपाडव्याला मुंबईत मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी यंदा पहिल्यांदाच नाशिक मधून जोरदार तयारी करण्यात आली आहे. सात ते आठ हजार कार्यकर्ते या मेळाव्याला नाशिक मधून उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

Raj Thackeray & Dinkar Patil
Congress Politics: काँग्रेसने केले 'स्मार्ट सिटी'चे पोस्टमार्टम, म्हणाले, ८७३ कोटींची कामे दाखवा!

याबाबत मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील यांनी माहिती दिली. या मेळाव्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. पक्षाचे पदाधिकारी सलीम शेख, सुजाता डेरे, अॅड रतनकुमार इचम, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, अंकूश पवार यांसह अनेक पदाधिकारी सक्रिय असल्याचे त्यांनी सांगितले.

Raj Thackeray & Dinkar Patil
Mahant Rajendradas: कुंभमेळ्याची सुरुवात चुकीची? निर्मोही अनिचे महंत राजेंद्रदास प्रशासनावर संतापले!

आगामी काळात अन्य पक्षाचे कार्यकर्ते देखील मनसे पक्षात सहभागी होतील. आमच्याकडे कोणतीही सत्ता नसली तरी जनतेचे प्रश्न घेऊन लढण्याची आमची तयारी आहे. त्यामुळे लवकरच शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आम्ही आंदोलन छेडणार आहोत.

गेली पाच वर्ष महापालिकेत भाजपची सत्ता होती. दोन वेळा त्यांच्या पक्षाचा महापौर होता. त्यांनी गेल्या पाच वर्षात हजारो कोटी रुपयांचा निधी आला. त्याचे काय केले? कोणती विकास कामे केली? शहरासाठी काय केले? हे त्यांना सांगता येईल का? हे सर्व भाजपला आम्ही विचारू. त्यासाठी प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांचे मेळावे घेऊ असे श्री. पाटील म्हणाले.

आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातून मनसेत प्रवेश केलेले दिनकर पाटील यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे भाजपसाठी दिनकर पाटील हे डोकेदुखी ठरू शकतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी नियुक्त करण्याचे सर्व अधिकार राज ठाकरे यांनी पाटील यांना दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात शहराचे राजकारण कोणत्या दिशेने जाते आणि त्यात मनसेचे स्थान काय हे स्पष्ट होईल.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com