Mahant Rajendradas: कुंभमेळ्याची सुरुवात चुकीची? निर्मोही अनिचे महंत राजेंद्रदास प्रशासनावर संतापले!

Simhastha Kumbh Mela; Rajendradas is upset, the government should not start the Sinhastha Kumbh Mela wrong way-कुंभमेळ्याशी संबंध नसलेल्या अनाधिकृत व्यक्तींशी होणाऱ्या प्रशासनाच्या चर्चेने नाराजी
Mahant Rajendradas
Mahant RajendradasSarkarnama
Published on
Updated on

Mahant Rajendradas News: नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याची लगबग शासनाच्या स्तरावर सुरू झाली आहे. या संदर्भात नाशिकला काही अनाधिकृत साधूंची प्रशासनासंबित बैठक झाली. त्याचे पडसाद सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीवर होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकतीच सिंहस्थ कुंभमेळ्याची आढावा बैठक झाली. या बैठकीत प्रशासनाच्या तयारी संदर्भात सादरीकरण करण्यात आले. काही कामांना मंजुरी देखील देण्यात आली. त्यात गोदावरी स्वच्छतेला प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे.

Mahant Rajendradas
Nashik Rikshaw Issue: धक्कादायक, रिक्षा चालकांकडून थेट महिलांवर हल्ले, लोकप्रतिनिधी आहेत कुठे?

यावेळी नाशिकच्या काही संस्था आणि साधूंची बैठक जिल्हाधिकाऱ्यांकडे झाली. यावेळी या साधूंनी जिल्हाधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. यावेळी काहींनी वादग्रस्त विधाने देखील केली. या संदर्भात आखाडा परिषदेचे पदाधिकारी चांगलेच नाराज झाले आहेत.

Mahant Rajendradas
Dr. Radhakrishna Vikhe Patil: नाशिकचे नेते एकवटले, गोदावरी खोऱ्यात पाणी वळण्यावर ठाम!

याविषयी निर्मोही अनिचे प्रमुख महंत राजेंद्रदास महाराज यांनी नाराजी व्यक्त केली. सिंहस्थ कुंभमेळा हा १३ आखाडे आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेशी संबंधित आहे. कुठल्याही अन्य संस्थांचा त्याच्याशी संबंध नाही. नकली साधू प्रशासनाशी कशी चर्चा करू शकतात, असा प्रश्न त्यांनी केला.

सिंहस्थ कुंभमेळा संदर्भात प्रशासनाला चांगली सुरुवात करावी लागेल. त्यासाठी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे पदाधिकारी आणि अन्य १३ आखाड्यांच्या आणि निमंत्रित करून बैठक घ्यावी. या बैठकीत आखाडा परिषद आपल्या सूचना आणि अपेक्षा व्यक्त करील. तीच साधूंची अधिकृत भूमिका असेल.

नाशिकच्या जिल्हा प्रशासनाने सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवातच चुकीची केली आहे. अनधिकृत साधू आणि संस्थांना त्यांनी महत्त्व देता कामा नये. अन्यथा त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. यासंदर्भात अद्याप पर्यंत नाशिकच्या प्रशासनाने आपल्याशी संपर्क केलेल्या नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजापिता ब्रह्माकुमारी, इस्कॉन यांसह कोणतीही मान्यता नसलेले काही साधू उपस्थित होते. त्यावरून वादाची ठिणगी पडली आहे. सुधीर दास पुजारी आणि अनिकेत देशपांडे हे अनाधिकृत आणि नकली साधू आहेत. गृहस्थ जीवन जगणारे साधू कसे होऊ शकतात?. त्यांना कोणती मान्यता आहे?. असा प्रश्न षडदर्शन आखाडा परिषदेचे महामंडलेश्वर शंकरानंद सरस्वती यांनी देखील उपस्थित केला होता. त्यामुळे बनावट साधूंच्या विषयावर नवा वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत.

-------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com