Chhagan Bhujbal Politics : होळकर की जगताप? लासलगावमध्ये भुजबळ कोणाला देणार आशीर्वाद

Lasalgaon APMC Election : येत्या ११ एप्रिलला बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदांसाठी निवडणूक होणार आहे. छगन भुजबळ हेच किंगमेकर ठरणार असल्याची चर्चा आहे.
Chhagan Bhujbal Politics
Chhagan Bhujbal PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News : लासलगाव बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. त्यामुळे या बाजार समितीच्या निवडणुकीला मोठं महत्व आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याच मतदारसंघात ती आहे. येत्या ११ एप्रिलला बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदांसाठी निवडणूक होणार आहे. छगन भुजबळ हेच किंगमेकर ठरणार असल्याची चर्चा आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या काही महिन्यांत अनेक राजकीय उलथापालथी घडल्या आहेत. पूर्वी कट्टर विरोधक असलेले जयदत्त होळकर आणि डी. के. जगताप आता एकाच बाजूने मैदानात उतरल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे नक्की सभापती पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? होळकर की जगताप? याचा अंतिम निर्णय माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या आशीर्वादावर ठरणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या दोघांपैकी छगन भुजबळ यांचा आशीर्वाद नक्की कुणाला लाभणार याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

Chhagan Bhujbal Politics
Shobha Fadnavis : भांडू नका, मोठेपणासाठी रडू नका ; मुख्यमंत्र्यांच्या काकूंनी भरसभेत सुधीर मुनगंटीवारांचे टोचले कान

सभापती पदासाठी डी. के. जगताप यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. तर उपसभापती पदासाठी डॉ. श्रीकांत आवारे यांची जास्त शक्यता वर्तवली जात आहे. कारण डी. के. जगताप हे सुरुवातीपासून भुजबळ यांचे कट्टर समर्थक आहे तर जरांगे फॅक्टरच्या काळात डॉ. श्रीकांत आवारे यांनी प्रचंड रोष पत्करूनही भुजबळांची साथ सोडली नव्हती. तसेच बाजार समितीत पंढरीनाथ थोरे हे भुजबळांच्या गटात आहेत.

या निवडणुकीत व्यापारी व आडते गटातील ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी निवडणुकीस आक्षेप घेतल्यानंतर गेली चार महिने निवडणूक लांबणीवर पडली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने निवडणुकीला परवानगी दिली आहे. मात्र, ही निवडणूक अंतिम निकालाच्या अधीन असणार आहे. सटाणा बाजार समितीत व्यापाऱ्यांना दोन मते देण्यात आली, पण लासलगावमध्ये त्याला नकार दिला गेला. त्यामुळे ‘दोन संस्था, दोन न्याय का’ हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. लासलगावमध्ये यापूर्वी पाच मंत्र्यांचा हस्तक्षेप सरपंच निवडणुकीत झाला होता.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या वेळेला मतदारसंघात जरांगे फॅक्टर दिसला होता. येवल्यात मराठा आंदोलकांनी आंदोलन केलं होतं. मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर अनेक मराठा आंदोलक भुजबळांच्या विरोधात गेले होते. त्याचवेळी भुजबळांपासून दुरावलेले जयदत्त होळकर अंतिम टप्प्यात पुन्हा एकत्र आले. त्यामुळे जयदत्त होळकर यांनाही सभापती पदाची संधी दिली जावू शकते अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Chhagan Bhujbal Politics
Mohan Bhagwat : मुस्लिमही RSS मध्ये येऊ शकतात का? स्वयंसेवकाच्या प्रश्नावर मोहन भागवतांनी दिलं उत्तर, पण ठेवली एक अट...

किंवा तिघांनाही संधी

विधानसभा निवडणुकीच्या वेळेला छगन भुजबळ यांना शेवटपर्यंत दिलेली साथ बघता सुरुवातीला डी. के. जगताप यांना सभापती केलं जावू शकतं. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या टर्म मध्ये पंढरीनाथ थोरे व जयदत्त होळकर यांना देखील संधी दिली जावू शकते. असाही राजकीय अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com