Raj Thackrey Politics: राज ठाकरेंकडे नाशिक महापालिकेसाठी कोणता मंत्र?

Raj Thackrey;Will MNS be rebuilt for the municipal elections?-मनसे भाजपशी युती करणार की स्वतंत्र निवडणुकांचा मार्ग स्वीकारणार
Raj_thackray
Raj_thackraySarkarnama
Published on
Updated on

MNS Nashik Politics: महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहरात गोंधळलेल्या अवस्थेत आहे. अनेक प्रमुख शिलेदार पक्ष सोडून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख राज ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत.

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार दिले होते. मात्र नाशिक शहरात मनसेच्या उमेदवारांनी अपवाद वगळता फारसा प्रभाव दाखवता आला नव्हता. त्यामुळे राज ठाकरे यांच्या पक्षाचे आगामी धोरण काय याबाबत पदाधिकारी ही गोंधळलेले आहेत.

Raj_thackray
Mahakumbh Mela: महाकुंभ मेळ्यात आज कोणता जागतिक विक्रम?, यामुळे होत आहे जगभर चर्चा!

विधानसभा निवडणुकीतच माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही यादरम्यान पक्षांतर केले आहे. अशा स्थितीत आगामी महापालिका निवडणुकांना हा पक्ष कसा सामोरा जातो याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

Raj_thackray
Jalgaon railway accident : 'अत्यंत दुर्दैवी घटना! स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन' ; फडणवीस यांची रेल्वे दुर्घटनेवर पहिली प्रतिक्रिया

विधानसभा निवडणुकीत पक्षाने नाशिक पश्चिम मतदार संघातून दिनकर पाटील यांना उमेदवारी दिली होती. श्री पाटील यांनी लक्षणीय मते घेऊन भाजपचे गणित बिघडविण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये मनसेला अपेक्षित यश मिळालेले नाही. अशीच स्थिती नाशिक पूर्व मतदार संघात देखील होती.

सध्या मनसेकडे आगामी राजकीय वाटचालीबाबत स्पष्ट धोरणाचा अभाव जाणवतो. शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी याबाबत पक्षाला सावरण्याचा प्रयत्न केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज पक्षप्रमुख राज ठाकरे नाशिक येथे येत आहेत. तीन दिवसांच्या त्यांच्या दौऱ्यात ते पदाधिकाऱ्यांची चर्चा करून राजकीय आढावा घेणार आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी महापालिका निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहे. या संदर्भात भाजप नेते आणि राज ठाकरे यांच्यात विविध बैठका झाल्या आहेत. यामध्ये नेमके काय ठरले हे बाहेर येऊ शकलेले नाही.

मनसे स्वबळावर मुंबईसह अन्य महापालिका निवडणुकांत उमेदवार देणार की महायुतीशी आघाडीकरणात हा सगळ्यांसाठीच उत्सुकतेचा विषय आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी इच्छुक उमेदवारांना मात्र मनसेने महायुतीशी सत्य केल्यास लाभ होईल, असे मत व्यक्त केले आहे. त्याबाबत पक्षनेते राज ठाकरे यांनी कोणतेही स्पष्ट संकेत दिलेले नाहीत.

या पार्श्वभूमीवर आजपासून त्यांच्या नाशिकच्या दौऱ्यात श्री ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देतात याची उत्सुकता आहे. या कानमंत्राने मनसे किती जोरात कामाला लागते आणि किती नवे पदाधिकारी पक्षाची जोडते हे महत्त्वाचे ठरेल.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com