Mahakumbh Mela: महाकुंभ मेळ्यात आज कोणता जागतिक विक्रम?, यामुळे होत आहे जगभर चर्चा!

Mahakumbh Mela; prayagraj Kumbh med record off highest 9.50 cr. Pilgrimage bath-जगातील सर्वाधिक गर्दी होणाऱ्या दहा धार्मिक उत्सवात महा कुंभमेळा ठरला पहिला
Mahakumbhmela, Yogi Adityanath
Mahakumbhmela, Yogi AdityanathSarkarnama
Published on
Updated on

Mahakumbh News: प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू होऊन आज दहा दिवस झाले आहेत. या कालावधीत जगभरातील अनेक भाविक आणि पर्यटकांनी येथे भेट दिली आहे. यामध्ये अनेक विषय चर्चेचे ठरले आहेत.

प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात आज ३४.५० लाख भाविकांनी स्नान केल्याची माहिती कुंभमेळा कक्षाकडून देण्यात आली आहे. मेळा सुरू होऊन दहा दिवस झाले आहेत. आज पर्यंत साडेनऊ कोटी भाविकांनी येथे त्रिवेणी संगमावर स्नान केले. हा एक जागतिक विक्रम आहे.

Mahakumbhmela, Yogi Adityanath
Manikrao Kokate politics: शेतकऱ्यांत खळबळ, नाशिकमध्येही बोगस पिक विम्याबाबत कारवाई सुरू

महाकुंभमेळ्यासाठी आजचा दिवस विशेष चर्चेचा ठरला. त्याला आणखीही काही कारणे आहेत. यामध्ये वैष्णव पंथाच्या तिन्ही आणि च्या साडेआठशे खालसांनी येथे मुक्काम ठोकला आहे. हे देखील वैशिष्ट्य मानले जाते.

Mahakumbhmela, Yogi Adityanath
Eknath Shinde Politics: तिढा `पालकत्वा`चा: भाजप यावेळीही एकनाथ शिंदेंना `जमिनी`वर आणणार?

यंदा १३ जानेवारीला सिंहस्थ कुंभमेळ्याचे पहिले शाही स्नान झाले. आतापर्यंत दोन शाही स्नान झाले आहेत. येत्या २९ जानेवारीला तिसरे शाही स्नान असेल. या शाही स्नानाला देशभरातील सर्व साधूंचे खालसा सहभागी होण्यासाठी प्रयागराज येथे दाखल होत आहेत. त्यामुळे येथे साधूंची संख्या रोज वाढत आहे.

आज महाकुंभमेळ्याच्या दहाव्या दिवशी ९.५० कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले आहे. सिंहस्थ कुंभमेळा विभागाकडून ही माहिती प्रसारित करण्यात आली आहे. हे एक जागतिक रेकॉर्ड आहे. जगभरातील दहा धार्मिक मेढ्यांमध्ये सर्वाधिक गर्दी होणारा मेळा म्हणून प्रयागराजचा कुंभमेळा अशी आज नोंद झाली.

जगभरात विविध धार्मिक उत्सव होतात. यामध्ये महा कुंभमेळा पहिल्या स्थानी राहिला आहे. इराक चा अर्कबिन उत्सव दुसऱ्या स्थानी तर फिलिपिन्स येथील पोप फ्रान्सिस यांच्या सामूहिक प्रार्थनेला तिसरे स्थान दिले गेले आहे. सौदी अरब येथे होणारी हज यात्रा चौथ्या क्रमांकावर आहे.

भारतातीलच गंगासागर येथे होणारा मकर संक्रांतीचा उत्सव हा पाचव्या स्थानावर आहे, हे विशेष. फिलिपिन्स येथे होणाऱ्या ब्लॅक नाझरीन, व्हॅटिकन सिटी येथे होणारा वार्षिक प्रार्थना (मास) महोत्सव तसेच जागतिक युवा दिन हे अन्य सर्वाधिक गर्दी होणारे जागतिक स्तरावरील उत्सव आहेत.

या निमित्ताने प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात आज सर्वाधिक भाविकांच्या उपस्थितीचा एक जागतिक विक्रम घडला. त्यामुळे भारतात होणारा कुंभमेळा चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय आहे. या निमित्ताने केवळ धार्मिक नव्हे तर अनेक विषयांसाठी त्याची चर्चा होते.

आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मंत्रिमंडळाची बैठक कुंभमेळ्याच्या ठिकाणीच घेतली. अशाप्रकारे मंत्रिमंडळाची होणारी ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. यामध्ये सात जिल्ह्यांचे धार्मिक पर्यटन सर्किट हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री आपल्या सर्व ५४ मंत्र्यांसह अरेल घाट येथून त्रिवेणी संगमावर स्नानासाठी गेले.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com