Aviation Minister K. R. Naidu & Rajabhau Vaje
Aviation Minister K. R. Naidu & Rajabhau VajeSarkarnama

Rajabhau Vaje Politics: खासदार वाजे यांनी नागरी उड्डाण मंत्र्यांच्या प्रदिर्घ बैठकीत हवाई सेवेचे कोणते दहा विषय मांडले?

Rajabhau Vaje; Rajabhau Vaje presented ten issues regarding Nashik's air services to Minister Naidu -राजाभाऊ वाजे यांची मागणी, नाशिकच्या विमानतळाला यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्याची मागणी केली.
Published on

Rajabhau Vaje News: खासदार राजाभाऊ वाजे यांनी नागरी उड्डाण मंत्री नायडू यांच्याकडे तब्बल दहा विषय मांडले. नवी दिल्लीत मंत्र्यांची भेट घेतल्यावर त्यांनी नाशिकच्या हवाई विस्ताराच्या अनेक विषयांना हात घातला. यानिमित्ताने नाशिकच्या हवाई सेवेच्या विस्ताराकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांची नुकतीच दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांनी नाशिकच्या ओझर विमानतळाच्या सर्वांगीण विकासासह हवाई संपर्क विस्ताराच्या अनेक महत्त्वपूर्ण मागण्यांकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. या प्रदीर्घ बैठकात विविध महत्त्वाच्या विषयांवर मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

नाशिक-दिल्ली दररोजची थांबवलेली विमान सेवा पुन्हा सुरू करण्यात यावी. ओझर विमानतळाचा टर्मिनल विस्तार करावा, नव्या धावपट्टीचे काम हाती घ्यावे, कुंभमेळ्याच्या तयारीसाठी हेलिपॅड्सची गरज, आणि नव्या हवाई मार्गांची मागणी अशा विविध बाबी मंत्र्यांसमोर ठामपणे मांडण्यात आल्या.

Aviation Minister K. R. Naidu & Rajabhau Vaje
Devayani Farande Politics : आमदार फरांदे संतप्त; महापालिकेनं मलमपट्टी थांबवावी अन् रस्त्यावर उतरावं!

सध्या आठवड्यात फक्त तीनच दिवस सुरु असलेल्या दिल्ली-नाशिक फ्लाइटमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही सेवा पूर्वीप्रमाणे दररोज सुरू झाल्यास, नाशिकच्या व्यापारी, वैद्यकीय, शैक्षणिक आणि धार्मिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असे वाजे यांनी स्पष्ट केले.

ओझर विमानतळावर एकाचवेळी एक हजार प्रवाशांची क्षमता असणारा नविन टर्मिनल उभारणे, टॅक्सी वे व नविन विमानतळ अप्रोच विकसित करणे, तसेच अधिक विमानतळ पार्किंग स्पेसची निर्मिती करणे या सगळ्या प्रस्तावांना केंद्र सरकारच्या सहकार्याची आवश्यकता आहे. यासोबतच, त्र्यंबकेश्वर, नाशिक शहर आणि ओझर येथे स्वतंत्र हेलिपॅड्सची उभारणी केली जावी, अशी विनंतीही त्यांनी केली.

खासदार वाजे यांनी ओझर विमानतळाचे नामकरण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावावर करण्याची मागणी केली. त्यांनी नाशिकमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ची स्थापना करून या भागाला औद्योगिक, संरक्षण आणि हवाई दृष्टीने सक्षम केले, याची आठवण त्यांनी मंत्री महोदयांना करून दिली.

हवाई वाहतूक सेवा ज्याठिकाणी चांगली असते त्या भागाच्या विकासाला महत्वपूर्ण इंजिन जोडले जाऊन विकासाची गती अधिक वाढते. त्यामुळे ओझर विमानतळ अधिकाधिक समृद्ध कसे होईल याकडे माझं लक्ष आहे. मंत्री नायडू जी यांना ओझर विमानतळाबाबतच्या अनेक प्रश्नबाबत सज्ञान करून त्याबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली आहे. त्यात दहा महत्त्वाच्या विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाल्याने हे प्रश्न मार्गी लागतील, असा दावा खासदार वाजे यांनी केला.

ठळक विषय-

१. भविष्यात मुंबईला पर्याय म्हणून ओझर विमानतळाचा विकास व्हावा.

२. नाशिक-दिल्ली विमानसेवा दररोज करावी.

३. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर ओझर विमानतळावर धावपट्टीचे विस्तारीकरण, टर्मिनल वाढ व हेलिपॅड्सची स्थापना करावी.

४. नाशिकहून कोलकाता, चेन्नई, पुणे, नागपूर, वाराणसी, कोल्हापूर आदी शहरांसाठी नियमित उड्डाणे सुरु करण्याची मागणी.

५. ओझरच्या विमानतळाचे स्व. यशवंतराव चव्हाण असे नामकरण करावे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com