Manikrao Kokate Vs Rajabhau Waje : आमदार माणिकराव कोकाटेंच्या विरोधात वाजे गटाचा उमेदवार कोण?

Sinnar Assembly Election 2024 : सिन्नरच्या राजकारणात पक्ष दुय्यम आणि गट महत्त्वाचा मानला जातो. सध्या येथे आमदार माणिकराव कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाजे हे दोन गट आहेत.
Manikrao kokate | Rajabhau waje
Manikrao Kokate | Rajabhau WajeSarkaranama
Published on
Updated on

Sinnar Political News : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) सगळ्यांचा राजाभाऊ वाजे हा एकच पक्ष होता. निवडणुकीत वाजे यांनी घवघवीत यश संपादन केले. आता विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार कोण? हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

सिन्नरच्या राजकारणात पक्ष दुय्यम आणि गट महत्त्वाचा मानला जातो. सध्या येथे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि खासदार राजाभाऊ वाजे हे दोन गट आहेत. वाजे यांच्यापासून दुरावलेले उदय सांगळे शिवसेनेच्या शिंदे गटाशी जवळीक साधून आहेत. तो सिन्नरच्या राजकारणाचा थर्ड अँगल असेल.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना एक लाख 59 हजार 492 आणि विरोधी शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांना अवघे 31 हजार 254 मते मिळाली. वाजे यांना एक लाख 28 हजार 238 मतांची आघाडी होती. ही सिन्नरची सर्व राजकीय पक्ष आणि गट एकत्र आल्याने मिळालेली आघाडी होती.

लोकसभा निवडणूक संपल्याने कार्यकर्ते पुन्हा कोकाटे आणि वाजे या दोन गटात विभागले जाणार आहेत. चार महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार म्हणून कोकाटे उमेदवार असतील. त्यांच्या विरोधात कोण हा गंभीर प्रश्न आणि पेच वाजे गटापुढे आहे.

Manikrao kokate | Rajabhau waje
Girish Mahajan Politics : निष्क्रिय पदाधिकाऱ्यांवर महाजन संतापले, अनेकांना दाखवणार घरचा रस्ता!

सध्या अनेक इच्छुक असल्याने आमदार कोकाटे यांना आव्हान देऊ शकेल, असा प्रबळ उमेदवार शोधण्याचे आव्हान खासदार वाजे यांच्या पुढे असेल. आमदार कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे, कोंडाजी मामा आव्हाड, बाळासाहेब वाघ, राजेश गडाख, जयंत आव्हाड असे विविध इच्छुक आहेत.

वाजे गटाच्या इच्छुकांमध्ये एकमत होणे सोपे नाही. अशा स्थितीत खासदार वाजे यांच्या पत्नी दीप्ती वाजे यांचे नाव पुढे आले आहे. त्यावर खासदार वाजे कितपत सहमती दर्शवतील हा प्रश्नच आहे. त्यामुळे यंदा सिन्नरच्या राजकारणात नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता आहे.

सिन्नरच्या राजकारणात यंदा मोठा ट्विस्ट निर्माण होऊ शकतो. आमदार कोकाटे यांच्या विषयी लोकसभेपूर्वी नकारात्मक वातावरण होते. कोकाटे यंदा अजित पवार गटात गेल्याने तेच उमेदवार असतील.

सिन्नर विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा दावा आहे. या पक्षाकडे उमेदवार कोण हा मोठा पेच आहे. सिन्नरच्या राजकारणाला सामाजिक किनार असते. येथे मराठा विरुद्ध वंजारी अशी विभागणी होत आली आहे. त्यानुसार उदय सांगळे हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.

Manikrao kokate | Rajabhau waje
Rajabhau Waje : लोकसभेनंतर विधानपरिषद; आचारसंहितेच्या बेड्यांना राजाभाऊ वाजे वैतागले...

उदय सांगळे सध्या शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत. शिंदे गट महायुतीचा घटक आहे. त्यामुळे त्यांना आमदार कोकाटे यांच्याबरोबर जावे लागेल. त्यात सांगळे यांची भूमिका काय? हा प्रश्न आहे. या सर्व घडामोडीत आमदार कोकाटे यांची कन्या सीमांतिनी कोकाटे आणि उदय सांगळे हे दोन नव्या नेतृत्वाचा उदय शक्यता आहे.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com