Rajabhau Waje News : नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पासाठी खासदार वाजे 'Action Mode'वर!

Nashik-Pune Railway Project and Rajabhau Waje : आता तरी 30 वर्षांनी हा प्रकल्प होईल का याची नाशिक व पुण्याच्या नागरिकांना उत्सुकता आहे.
Rajabhau waje
Rajabhau wajesarkarnama
Published on
Updated on

Nashik-Pune Semi High Speed ​​Railway News: मागील पाच वर्ष नाशिक पुणे रेल्वे प्रकल्पाची सातत्याने चर्चा होत होती. माजी खासदार हेमंत गोडसे यांनी या प्रकल्पाचे श्रेय देखील घेतले होते. प्रत्यक्षात मात्र या प्रकल्पाची वस्तुस्थिती वेगळीच आहे.

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग 2021च्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र रेल कार्पोरेशनच्या माध्यमातून त्याची उभारणी होणार होती. सुमारे 16 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.

या प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी सातत्याने लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. माजी खासदार हेमंत गोडसे(Hemant Godse) यांनी आपल्या निवडणूक घोषणापत्रातही हा प्रकल्प मार्गी लावल्याचा दावा केला होता. प्रत्यक्ष वस्तूस्थिती मात्र वेगळीच आहे. या प्रकल्पावर काहीच काम झाले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर नवीन खासदार निवडून आले. त्यांनी या प्रकल्पाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकल्पाची फाईल मंत्रालयात अक्षरशः धूळ खात पडून आहे. त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

Rajabhau waje
Rajabhau Waje Politics : खासदार वाजे नागरी उड्डाण विभागावर का संतापले?

खासदार वाजे(Rajabhau Waje ) यांनी हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी पुढाकार घेतला. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार होती. मात्र मुंबईत मुसळधार पाऊस होऊन वाहतूक विस्कळीत झाल्याने ही बैठक लांबणीवर पडली आहे.

खासदार वाजे यांनी नाशिक मतदार संघातील विविध प्रलंबित प्रकल्पांना चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेते. नाशिक पुणे रेल्वे प्रकल्प हा नाशिक आणि पुणे याबरोबरच नगर जिल्ह्यासाठीही महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने त्याला चालना देण्याची मागणी वाजे यांनी केली आहे.

या संदर्भात पूर्वीच्या मार्गात बदल न करता मंजूर मार्गावरूनच या रेल्वेचे काम सुरू करावे. राज्य शासनाने केंद्र शासनाकडे तसा प्रस्ताव पाठवावा. यासाठी आपण पाठपुरावा करीत आहोत असे खासदार वाजे म्हणाले.

नाशिक पुणे रेल्वे मार्ग व्हावा यासाठी प्रदीर्घ काळ मागणी करण्यात येत आहे. या संदर्भात 1994मध्ये तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी आणि नाशिकचे खासदार डॉक्टर वसंतराव पवार यांनी सर्वेक्षणाला मंजुरी मिळविली होती. त्यासाठी निधीची तरतूद देखील करण्यात आली होती.

Rajabhau waje
Sharad Aher : काँग्रेस नेते शरद आहेर म्हणाले, "किमान दोन इच्छुकांनी तरी उमेदवारी मागावी"

यासंदर्भात नाशिक रोड रेल्वे स्थानकावर त्याचे भूमिपूजन देखील झाले होते. तेव्हापासून हा प्रकल्प व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आता तरी तीस वर्षांनी हा प्रकल्प होईल का याची नाशिक व पुण्याच्या नागरिकांना उत्सुकता आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com