Rajabhau Waje Live : सिन्नरमध्ये राजाभाऊ वाजेंच्या शपथविधीचे थेट प्रक्षेपण

Live broadcast of your beloved MP oath ceremony in Sinnar : एलईडी टीव्ही लावून माझे समर्थकांनी शपथविधीच्या कार्यक्रमात केला जल्लोष.
Rajabhau Waje Live
Rajabhau Waje LiveSarkarnama
Published on
Updated on

Rajabhau Waje News : संसदेच्या अधिवेशनात आज नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी झाला. हा कार्यक्रम वाहिन्यांवर पाहण्यासाठी मतदारसंघातील खासदारांच्या समर्थकांनी गर्दी केली होती.

नाशिकचे खासदार वाजे (Rajabhau Waje) यांनी आज सकाळी अकराला संसदेत शपथ घेतली. खासदार वाजे शपथ घेत असल्याने सिन्नर शहर आणि परिसरातील समाज माध्यमांवर त्यांच्या समर्थकांनी जोरदार सेलिब्रेशन केले. कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम पाहावा असे आवाहन देखील करण्यात येत होते.

खासदार वाजे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर एलईडी टीव्ही लावून शपथविधीच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण दाखविण्यात आले. या कार्यक्रमासाठी समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. वाजे यांनी शपथ घेतल्यावर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Rajabhau Waje Live
Video Nilesh Lanke : नीलेश लंकेंनी विखेंच्या नाकावर टिच्चून लोकसभेत इंग्रजीतून घेतली शपथ

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वाजे हे मोठ्या मताधिक्याने नाशिक मतदारसंघातून (Nashik Constitunecy) विजयी झाले होते. त्यांनी शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा पराभव केला. सिन्नर विधानसभा मतदारसंघांमध्ये ही निवडणूक एकतर्फी झाली होती.

Rajabhau Waje Live
Gowal Padvi : गोवाल पाडवींनी शपथ घेताच सत्ताधारी-विरोधक भिडले! राहुल गांधींशी ‘शेक हँड’...

खासदार वाजे यांचा शपथविधी आज झाला. मात्र त्यांनी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच कामाला सुरुवात केली आहे. विविध कार्यकर्ते आणि मतदार रोजच त्यांना विविध कारणांसाठी संपर्क करीत असतात. ते पहिल्यांदाच लोकसभेत (Loksabha Election) निवडून गेल्याने त्यांच्या समर्थकांत आनंदाचे वातावरण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com