Rajabhau Waje : 'गरजवंत मराठ्यांच्या आंदोलनास पाठिंबा' खासदार वाजेंनी जाहीर करुन टाकलं..

Rajabhau Waje supports Maratha reservation protest : नाशिक लोकसभा खासदार राजाभाऊ वाजे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
Rajabhau Waje
Rajabhau WajeSarkarnama
Published on
Updated on

Rajabhau Waje : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. या आंदोलनात राज्यभरातील कानाकोपऱ्यातून मराठा बांधव, कार्यकर्ते सहभागी झाले आहे. नाशिकमधूनही जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं बळ मिळालं आहे. शेकडो कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहेत.

यात विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यात आता नाशिकचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. मराठा समाजाच्या न्याय्य मागण्या पूर्ण व्हाव्यात, शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठीचा हक्क मिळावा आणि समाजाचा आत्मसन्मान अबाधित रहावा, हेच माझे ध्येय आहे. हा संघर्ष स्वाभिमानाचा असून, तो यशस्वी होईपर्यंत माझा पाठिंबा अविरत राहील असं राजाभाऊ वाजे यांनी म्हटलं आहे.

मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा संघर्ष आज पुन्हा एकदा मुंबईच्या आझाद मैदानावर जनआंदोलनाच्या रुपाने उभा आहे. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले हे आंदोलन केवळ काही मागण्यांचा उच्चार नाही, तर समाजाच्या अस्तित्वाची व सन्मानाची हाक आहे. मनोज दादांनी या आंदोलनाला शांतता, संयम आणि सामाजिक सलोख्याचा आधार दिला आहे. महिलांचा सन्मान राखणे, शासकीय संपत्तीचे रक्षण करणे, कायदा हातात न घेणे या त्यांच्या सूचनांमुळे हे आंदोलन लोकशाहीचा आदर्श ठरते असे राजाभाऊ वाजे यांनी म्हटलं आहे.

Rajabhau Waje
Nashik Kumbh Mela : कुंभमेळा नियोजनावरुन नेत्यांमध्ये वाद, तिकडे साधु-महंतही नाराज ; जिल्हाधिकाऱ्यांनाच घ्यावी लागली दखल

आज लाखो मराठा बांधव मुंबईतील आझाद मैदान येथे एकवटले आहेत. विशेषतः गरीब कुटुंबांसाठी शिक्षण आणि नोकरीच्या संधी मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शासनाने केवळ तात्पुरते आश्वासन न देता कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, जेणेकरून पुढे पुन्हा आंदोलन करण्याची वेळ समाजावर येणार नाही असही खासदार वाजे यांनी म्हटलं आहे.

Rajabhau Waje
Manoj Jarange Patil Agitation: अजित दादांच्या आमदार सरोज अहिरे म्हणाल्या, माझा जरांगेंना मनापासून पाठिंबा, खासदार भगरे थेट आझाद मैदानात!

दरम्यान केवळ विरोधी पक्षातीलच नाही तर सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाच्या आमदार सरोज अहिरे यांनीही लोक भावनेचा आदर म्हणून आरक्षण आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. दिंडोरी लोकसभा खासदार भास्कर भगरे यांनी तर आंदोलस्थळी जाऊ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व आंदोलनाला समर्थन असल्याचं स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com