'संपाचा हट्ट कायम असेल तर कर्मचाऱ्यांचे रक्षण त्यांच्या पुढाऱ्यांनीच करावे'

भरगोस पगारवाढ करुनही संप मागे न घेण्याचा हट्ट म्हणजे सर्वनाशच
ST Strike
ST Strike Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : गेल्या तीन आठवड्यांपासून सुरु असलेल्या एसटी संपावर (ST Strike) तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने (Mahavikas Aghadi) एसटी कामगारांच्या पगारात भरगोस वाढ केली. त्याचबरोबर त्यांना एसटी संप न ताणण्याचे आवाहनही केले. मात्र अद्यापही एसटी कामगार आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि एसटी कामगारांमधील दरी अधिकच खोल होत असल्याचे दिसत आहे. अशातच एसटी कामगारांना विरोधी पक्षातील नेत्यांचा पाठिंबा पाहता, एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत तर त्यांचे पुढाऱ्यांनीच त्यांचे रक्षण करावे, अशी टीका शिवसेनेने (Shivsena) केली आहे.

दैनिक सामनाच्या अग्रलेखातून एसटी कामगारांना कामावर रुजू होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ''सरकारने घसघशीत पगारवाढ करूनही एस.टी. कामगारांचे पुढारी संपाचा हेका सोडायला तयार नाहीत. संप हे पगारवाढीसाठीच होत असतात. सरकारने एस.टी. कर्मचाऱयांना भरघोस पगारवाढ करूनही संपाचा हट्ट कायम असेल तर कामगारांचे पुढारीच कामगारांचे रक्षण करोत.''असे म्हणत शिवसेनेने एसटी संपावर पुन्हा निशाणा साधला आहे.

ST Strike
मूड महाराष्ट्राचा : जाणून घ्या महाराष्ट्राची राजकीय हवा

''एस.टी. कर्मचाऱ्यांनी भरघोस वेतनवाढीनंतरही आम्ही संपावर आहोत व संप मागे हटणार नाही’’, असे सांगणे हा आत्मनाश आहे. ते लोक आपल्या कुटुंबास विनाशाकडे ढकलत असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. तसेच,कोणत्याही संपाच्या काळात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते. एस.टी. संपातही राज्याचे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेच आहे. त्यामुळे संपकऱ्यांच्या नेत्यांकडून ही नुकसानभरपाई न्यायालयाने करून घेतली पाहिजे. ज्यांनी एसटीसाठी रक्त, घाम गाळला आहे अशांनीच तोट्यातली एस.टी. दरीत ढकलणे योग्य नाही,'' असेही शिवसेनेने म्हटले आहे.

आझाद मैदानावरील (Azad Maidan) आंदोलनही आता ढिले पडू लागले आहे. आतापर्यंत 24 आगारांतील वाहतूक सुरू झाली असून दहा हजारांवर कर्मचारी कामावर परतले आहेत. रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांची सेवा संपविण्यात आली आहे. संपादरम्यान 3 हजार 83 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आता कामगारांचे पुढारी हे कामगारांचे घर, कुटुंब चालविण्याची काय व्यवस्था करणार आहेत?, असा सवालही शिवसेनेने अग्रलेखातून विचारला आहे.

त्याचवेळी, शेतकरी नेते सदाभाऊ खोत व भाजप नेते गोपीचंद पडळकर या पुढाऱ्यांचा तसा एस.टी. कामगारांशी संबंध नव्हता. तरीही ते संपात घुसले, पण संप हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच दोन्ही नेत्यांनी आझाद मैदानातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणतात, असा टोलाही शिवसेनेने त्यांना लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com