Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत उमेदवारांसह प्रचार करणाऱ्यांचीही धावपळ होत आहे. यामुळे लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांना आराम दुरापस्थ होत आहे. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होण्याची शक्यताही आहे. या धावपळीत काही जण वेळ मिळेल तसा किंवा योग्य जागा मिळाली तर थोडा का होईना आराम करतात. मात्र तसे शक्य झाले नाही तर भर कार्यक्रमात त्यांच्यावर नामुष्कीची वेळ येते. असाच प्रकार शिंदे गटाचे प्रवक्ते राजेंद्र वाघमारे यांच्याबाबत घडला.
सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. उन्हाने तापलेले वातावरणात राजकीय आरोप-प्रत्यारोप भर टाकताना दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील MVA नेते आपल्या उमेदवारांसाठी या उन्हाची तमा न बाळगता प्रचार करताना दिसत आहे. अशा वातावरणात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे Nilam Gorhe या नगरमध्ये आल्या होत्या.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सदाशिव लोखंडे Sadashiv Lokhande यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या नगरमध्ये होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत राजेंद्र वाघमारे होते. गोऱ्हे पत्रकारांशी संवाद साधत असताना वाघमारे यांना मात्र झोप आवरत नव्हती. त्यांना कधी डोळा लागला हेही समजले नाही. त्यांना झोपलेले पाहून गोऱ्हे यांनी त्यांना उठा जरा..., असे म्हणत वाघमारेंना उठवले. त्यावेळी वाघमारे झोपेतून जागे होत सावरुन बसले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सध्या लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. राज्यात पुढच्या टप्प्यातील निवडणुकीसाठी सर्व राजकीय मंडळी रात्रीचा दिवस करताना दिसत आहेत. आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी संबंधित मतदारसंघात सभा घेण्यावर भर दिला जात आहे. त्यातच सध्या ऊनही वाढल्याने सकाळचा जोश दुपारपर्यंत टिकत नाही. त्यामुळे अनेकांना थकवा जावणतो. त्यामुळे काही वेळा मोठ्या कार्यक्रमातही काही नेत्यांना झोप आवरता येत नाही.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.