Ramdas Athawale On BJP : मी भारतीय जनता पक्षासोबत आहे. त्यांच्या सरकारमध्ये मंत्री आहे. त्यामुळे त्या सरकारच्या निर्णयाचे समर्थन करतो. मात्र त्या पक्षासोबत असलो तरीही मी भाजपचे विचार स्वीकारलेले नाहीत, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज धुळ्यात स्पष्ट केले.
आमच्या पक्षासाठी महाराष्ट्रातील दोन लोकसभा मतदारसंघ भाजपने सोडले पाहिजेत. त्यासाठी आम्ही आग्रही आहोत. आगामी निवडणुकीत ‘आरपीआय’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी राहील, असे आठवले म्हणाले.
मोदी सरकार म्हणजे ‘आरएसएस’ नव्हे. केंद्रातील सरकार हे भारतीय संविधानाच्या अजेंड्यावर चालते. संविधान बदलण्याची कुणामध्येही हिंमत नाही. मोदी सरकारने 2014 मध्ये 282, 2019 मध्ये 303 जागा जिंकल्या. आता 2024 मध्ये 404 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. देशातील जनता पंतप्रधान मोदी यांच्या पाठीशी आहे, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, 'पंतप्रधान मोदी हे संविधान बदलतील, असा खोटा प्रचार देशासह राज्यात सुरू आहे. परंतु संविधान बदलण्याची हिंमत कुणामध्येही नाही. संविधान बदलण्याची आवश्यकताही नाही. संविधानामध्ये कायदे करणे, कायद्यात दुरुस्ती, कायदा रद्द करण्याची तरतूद आहे. त्यामुळे संविधान बदलणार या केवळ वावड्या आहेत.'
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात 26 नोव्हेंबर हा संविधानदिन पाळला जात आहे. काँग्रेसला तसे का आठवले नाही?, असा प्रश्न त्यांनी केला. ते म्हणाले, 'पंतप्रधान मोदी यांनी संसदेला ‘संविधान सदन’ हे नाव दिले आहे. इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे स्मारक होत आहे. या देशात हिंदू बहुसंख्य असून इतर धर्मांचेही अनुयायी वास्तव्यास आहेत. त्यामुळे द्वेषभावनेला कोठेही थारा नाही.'
मी आरपीआयसह पँथरचे काम करीत असताना अनेक बैठका मंदिराच्या सभामंडपात झालेल्या आहेत. बंधुभावाचे तत्त्व घटनेने सांगितले आहे. श्रीराम मंदिर हा धर्माचा विषय नाही. त्यामुळे श्रीराम मंदिराचे आमंत्रण सर्व राजकीय पक्षांसह धर्मगुरूंना दिल्याचे रामदास आठवले म्हणाले.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.