Nashik Politics: शिवसेनेच्या बागुल यांनी वाढवलं भुजबळांचं टेन्शन; करण गायकरांच्या 'या' निर्णयाला दिला पाठिंबा

Sunil Bagul: क्रांतिवीर छावा सेनेच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
Sunil Bagul
Sunil BagulSarkarnama
Published on
Updated on

अरविंद जाधव :

Nashik News: 'मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळांच्याविरोधात करण गायकर लढले तर सर्व मराठा समाजाचे राजकीय नेते पक्ष विचारधारा बाजूला ठेवून गायकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून ताकद देऊ, येवल्यामधून निवडून आणण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न मी स्वत: करेल,' असे जाहीर आश्वासन शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल यांनी दिले आहे.

क्रांतिवीर छावा सेनेच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमादरम्यान छावा सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली, तसेच मराठा आरक्षणाला भुजबळांकडून होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आपण स्वत: येवल्यामधून भुजबळांविरोधात निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sunil Bagul
Kolhapur ACB Trap : एसीबीचा दणका! भूमी अभिलेख अधीक्षकांना दहा हजारांची लाच घेताना अटक

कार्यक्रमास सर्वच पक्षाचे नेते उपस्थित होते. निवडणुकीसाठी रसद मराठा समाज स्वखुशीने गोळा करून देईल. करण गायकर हे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी जुळवून घेणारे नेतृत्व आहे, त्यामुळे त्यांना विजयी करणे हे महत्त्वाचे असल्याचे बागुल म्हणाले. माजी महापौर दशरथ पाटील यांनीदेखील गायकर यांचे समर्थन केले. मी अजून कुठल्याही राजकीय पक्षात नाही, त्यामुळे करण गायकर यांनी मला कुठेही बोलवावं, त्या ठिकाणी मी येऊन तुमच्या पाठीशी उभा राहीन, असे आश्वासन दिले.

ॲड. शिवाजी सहाने यांनीसुद्धा करण गायकर यांना पाठिंबा दर्शवला. मराठा समाजासाठी अनेक वेळा त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा त्याग करून समाजाच्या उन्नतीसाठी काम केले आहे. येणाऱ्या काळात ते जे राजकीय निर्णय घेतील, त्यांच्याबरोबर आम्ही सर्व ठामपणे उभे राहू, असे स्पष्ट केले.

नाशिकमधून पाठिंबा पण येवल्याचे काय ?

करण गायकर यांनी उमेदवारी जाहीर केली. नाशिकमधील मराठा समाजातील नेत्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला. मात्र, येवल्यातूनसुद्धा भुजबळांविरोधात मराठा समाजाचे नेते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. फक्त भुजबळांना विरोध म्हणून इच्छुक मराठा नेत्यांमध्ये दिलजमाई कशी होणार आणि सर्व मिळून एक भक्कम उमेदवार कसा देणार, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे.

दरम्यान, वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते सुनील भाऊ बागुल, आमदार हिरामण खोडकर, माजी महापौर दशरथ पाटील, शिवाजी सहाणे, मराठानेते किशोर चव्हाण, मनसेचे जिल्हाप्रमुख सुदाम कोंबडे यांच्यासह शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

(Edited By Ganesh Thombare)

Sunil Bagul
Teacher Bribe News : धक्कादायक! चक्क मुख्याध्यापिकेने घेतली शिक्षकाकडून लाच; अडकल्या ACB च्या जाळ्यात...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com